शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

वैनगंगा नदीच्या दूषित पाण्याचा अनेकांना फटका

By admin | Published: February 02, 2016 1:02 AM

वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचे घाण पाणी रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.

उपाययोजनांची गरज : रिपब्लिकन सेनेचा आंदोलनाचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनभंडारा : वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचे घाण पाणी रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींसह व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रीत करून समस्या सोडवावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसीखुर्द येथे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधले आहे. त्यामध्ये पाणी साठविणे सुरु झाले असल्याने पाणी सिंचीत राहू लागले आहे. नागपुरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. पाणी गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमीकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेच्या पाण्यात जमा होत आहे. त्यामुळे गोसे धरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे.धरणात पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्द पासून सुमारे तीस पस्तीस किलोमिटर भंडारा - कारधा पर्यंत वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे. पवनी व भंडारा येथे नगरपरिषद द्वारा लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा वैनगंगा नदीतूनच केला जातो. जरी फिल्टर करून पाणी दिल्या जाते तरी पाणी पिताना पाण्याचा वेगळाच वास येतो. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारचा रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नदीकाठावर बरेच गावे आहेत. तेथील स्त्री पुरुष नदीच्या पाण्यात आंघोळ करतात. त्या दूषित पाण्यामुळे काही लोकांच्या अंगाला खाज सुटणे, अंगावर लालसर चट्टे येणे आदी प्रकार दिसून येत आहेत. ग्रामपंचायतमार्फत याच नदीतील पाणी गावातील लोकांना पिण्यासाठी पुरविले जाते. फिल्टरची खास सोय नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या दूषित पाण्यापासून फारच धोका निर्माण झाला आहे.नदी काठावरील गावचे गुरेढोरे, शेळ्या मेंढ्या नदीतीलच पाणी पितात. परंतु दुषित पाण्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा रोगराई निर्माण झाली आहे. सबब नदीकाठावरील गावचे लोक या दूषित पाण्यामुळे त्रस्त झाले असून प्रत्येक माणसाचे मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पवनी परिसरात कावीळ रोगाचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. वैनगंगेचे पाणी दूषित होण्याचे प्रमुख कारण म्हणजे नागपूर शहरातून वाहत येणाऱ्या नाग नदीचे घाण व रासायनिक पाणी होय. सबब वैनगंगेच्या पाण्यात नाग नदीचे दूषित घाण पाणी जाऊ न देण्याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण नागरिकांच्या आरोग्यास दिवसेंदिवस रोगराईचा धोका निर्माण होत आाहे.संपूर्ण नदी पात्रातील साचलेले पाणी दूषित झाल्यामुळे मासोळ्यांचे उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे नदी काठावरील ढिवर समाजाचे रोजगारावर गंभीर परिणाम झाला आहे. नाग नदीचे घाण पाणी वैनगंगेच्या पाण्यात जाऊ न देण्यासंबंधाने शासन स्तरावरून योग्य ती कारवाई तातडीने सुरु करावी. नाग नदीचे घाण पाणी वैनगंगा नदीच्या पाण्यात जावू न देता ते पाणी शुद्ध करावे किंवा इतरत्र वळवावे, नदी काठावरील जनतेच्या आरोग्याचा तसेच शेतकऱ्यांचे गुराढोरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्यथा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख तुलशीराम गेडाम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल. (नगर प्रतिनिधी)