आॅनलाईन लोकमतपवनी : देशात ग्रामीण व शहरी भागात बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत असला तरी पवनी व आजुबाजुच्या ग्रामीण क्षेत्रात मिरचीच्या उलाढालीमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सद्यस्थितीत तालुक्यात तोड्यानंतर मिरचीचे सातरे पाहावयास मिळत आहे.पावसाळा संपल्यानंतर दरवर्षी मिरीचे उत्पादन झाल्यानंतर दिल्ली व देशातील इतर प्रदेशात भिवापूरी मिरची व हैद्राबादी मिरचीला फार मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे मिरीचे वाळवण व खुडणे यासाठी गावाच्या बाहेरील भागात सातºयाची निर्मिती केली जाते. गावातील महिला, पुरुष, वयोवृध्द सर्व त्या ठिकाणी एकत्र येतात. मिरची देढ काढण्याच्या मोबदला दर किलोला १० ते १५ रु. असा घेतला जातो. तर प्रत्येक व्यक्ती १०० ते १५० रु. रोजी पडत असतो. मिरची खुडण्यासाठी हिरवी पाल तर कुठे तंबु उभारल्या जातो. पवनी शहरात २ ते ३ ठिकाणी सातरा बेटाळा, वाही, निष्ठी अश्या ग्रामीण परिसरात अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. सुट्टीच्या दिवसात तरुण विद्यार्थी सुध्दा सातºयात जातात.मिरची खुळण्यासाठी तंबु असतो तर मिरची वाळविण्यासाठी खुले मैदान असते. मिरचीचे वाळवण व खुडणे झाल्यानंतर नागपूर येथील मोठे व्यापारी मिरची चे खेरदी करुन दिल्ली व इतर ठिकाणी मिरचीची विक्री करतात. मिरची जरी तिखट असली तरी मिरचीच्या सातºयाने रोजगार उपलब्ध केला अनेकांना यातून लाभही होत आहे.
मिरचीच्या ‘सातऱ्या’ने दिला अनेकांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:30 PM
देशात ग्रामीण व शहरी भागात बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत असला तरी पवनी व आजुबाजुच्या ग्रामीण क्षेत्रात मिरचीच्या उलाढालीमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
ठळक मुद्देउपजीविकेचे साधन : मिरचीला परराज्यात मागणी