राज्यात ३१७ किल्ले : पर्यटनप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरणभंडारा : विदर्भात नैसर्गिक व ऐतिहासिक किल्ल्यांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात जवळपास ३१७ किल्ल्यांची नोंद आहे. राज्यातील २५ ऐतिहासिक गड किल्ल्यांची महाराष्ट्र शासनाचे पुरातत्व विभागामार्फत जीपीएस (गुगल पोझिशनिंग सिस्टीम) प्रणालीद्वारे लवकरच मॅपिंग करण्यात येणार आहे, ज्यामध्ये भंडारा जिल्हयातील आंबागड व नागपूर जिल्हयातील नगरधन (रामटेक) या किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे. संवर्धन व पर्यटन वाढावे या दृष्टीने जीपीएस मॅपिंग करुन नंतर सॅटेलाईट मार्फत किल्ल्याची ‘पाईट टू-पार्इंट’ माहिती संकलित करुन आराखडा तयार केला जाईल. या यंत्रणेमुळे गडकोट प्रेमीना गुगलवर किल्ल्याचे नाव लिहिताच किल्ल्याचा इतिहास व दैनंदिन स्थिती थेट बघता येणार आहे. या निर्णयाने जिल्हयातील पर्यटक व गडकोटप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.आंबागड किल्ल्याचे जतन, सौंदर्यीकरण, रंगरंगोटी ईत्यादीचे कामे झाली असून पर्यटक व गडकोट पे्रमींची संख्या सतत वाढत आहे. आंबागड किल्ल्याकरिता अनेक वर्षापासून ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्थेचे संस्थापक सईद शेख सतत प्रयत्नशील आहेत. पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विराग सोनटक्के व त्यांचे सहकारी यांचे सईद शेख यांनी स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)
आंबागड किल्ल्याची होणार ‘जीपीएस मॅपिंग’
By admin | Published: October 12, 2015 1:05 AM