३० लाखांचा निधी मंजूर : राज्यातील १२ बाजार समित्यांचा समावेश मोहन भोयर तुमसरशेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळावी तथा शेतमालाची खरेदी पारदर्शी व्हावी याकरिता तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीने डिजीटीलायझेन (आॅनलाईन) दहा दिवसात दिल्लीवरुन साहित्य येत आहे. डिजीटीलायझेन होणारी जिल्ह्यातील एकमेव बाजार समिती ठरली आहे. देशातील व्यापारी येथून शेतमाल खरेदी करु शकेल हे विशेष.राज्यात १२ बाजार समित्यांची निवड करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी शेतमाल विक्री करतात. स्थानिक तथा जिल्ह्यातील व्यापारी मुख्यत: तो खरेदी करतात. विज्ञान, संगणक व त्यापुढील इंटरनेट युगात आॅनलाईन साहित्य खरेदी विक्री करण्याची चढाओढ सुरु झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळत नाही. विशेषत: शेतमाल विक्री केल्यावर रक्कमेकरिता बरीच प्रतिक्षा करावी लागते. यातून सुटकेकरिता व योग्य किंमत मिळून देशांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीची सोय उपलब्ध व्हावी याकरिता मोठे पाऊल उचलले आहे.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत डिजीटीलायझेन अंतर्गत शेतमाल विक्री करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. समितीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. भंडारा जिल्ह्यातील केवळ तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड करण्यात आली. तर गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड करण्यात आली. राज्यातून १२ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड करण्यात आली आहे. हे विशेष. केंद्र शासनाकडून याकरिता ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे. येत्या चार दिवसात नवी दिल्ली येथून डिजीटीलायझेनचे साहित्य तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणार आहे. तुमसर बाजार समिती कार्यालयात एक विशेष कक्ष स्थापन करण्यात येत आहे. पहिला टप्पा पूर्ण करण्याच्या हालचाली पुर्ण झालयावर आठ दिवसात नवी दिल्ली येथून एक अधिकारी तथा अभियंत्याचे प्रतिनिधी मंडळ तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देणार आहे. डिजीटीलायझेनची कामे कशी करावी याकरिता बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना शासनातर्फे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. याकरिता इंटरनेट सेवेकरिता स्पीड मिळावे याकरिता स्पीड इंटरनेट सेवा पूणेशी जोडली जाणार आहे. केंद्र शासनाचे डिजीटीलायझेनकरिता अनुदान प्राप्त व्हावे याकरिता आमदार चरण वाघमारे यांची मोठी मदत प्राप्त झाली. त्यांच्या मार्गदर्शनातच एक आदर्श बाजारसमितीकडे वाटचाल सुरु आहे. शेतकऱ्यांच्या हितालाच प्रथम प्राधान्य येथे देण्यात येत आहे.- भाऊराव तुसमरे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर
बाजार समितीची ‘डिजिटील’कडे वाटचाल
By admin | Published: March 06, 2017 12:16 AM