कोट
पणन विभागाची जबाबदारी
मनोहर राऊत शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांना जिल्हा पणन विभागाद्वारे बारदाण्याचा पुरवठा केला जातो. यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना स्वत: बारदाणा उपलब्ध करण्यासाठी प्रवृत्त केले होते. दरम्यान, शेतकऱ्यांद्वारा उपलब्ध करण्यात आलेल्या बारदाण्यांची राशी शासनाद्वारे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी पणन विभाग जबाबदार आहे. -मनोहर राऊत, माजी सदस्य, जिल्हा परिषद
कोट बारदाणाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट
सुरेश ब्राम्हणकर पणन विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना जबरदस्ती करून स्वत:चा बारदाणा उपलब्ध करण्याचे सांगण्यात आले. आधारभूत धान खरेदी केंद्रांना बारदाणा उपलब्ध करण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे. मात्र, स्वत:ची जबाबदारी टाळून शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी बारदाणा उपलब्ध करण्याचा आग्रह केला.
-डॉ. सुरेश ब्राह्मणकर, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती