शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

बाजारपेठा हाऊसफुल्ल

By admin | Published: October 29, 2016 12:32 AM

दिवाळी म्हणजे अंधारावर मात करून आनंदाचा प्रकाश आणणारा सण. यंदा दिवाळीत नवा उत्साह, नवा जल्लोष, ...

दिवाळीत खरेदीची धूम : दागिने व ब्रॅण्डेड वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कलभंडारा : दिवाळी म्हणजे अंधारावर मात करून आनंदाचा प्रकाश आणणारा सण. यंदा दिवाळीत नवा उत्साह, नवा जल्लोष, नवी आशा, नवा हुरूप दिसत आहे. महागाई वाढली असली तरी त्याची कुठलीही छाया दिवाळीच्या खरेदीवर पडली नसल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत, फर्निचरपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंतच्या विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. दिवाळीत सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीची धूम आहे. बाजारात रेडिमेड कपड्यांच्या दुकानात पाय ठेवायलाही जागा नाही. रांगोळ्या, आकाशदिवे, मातीचे दिवे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. धनत्रयोदशीला नवीन वाहन घरी नेण्यासाठी ग्राहकांची दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी दिसत आहे. फटाक्यांची दुकानेही शहरात सजली आहेत. उल्लेखनीय म्हणजे काही नवीन प्रकारचे प्रदूषणमुक्त फटाके यंदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.साईराज मोटर्सचे संचालक राजेंद्र बन्सोड यांनी सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत आता शोरूममध्ये जाऊन वस्तू हाताळून खरेदी करण्याकडे लोकांचा ओढा दिसून येत आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहता जास्त स्टॉक करावा लागत आहे. फायनान्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुणवत्तेच्या उत्पादनांना ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. रोकडे ज्वेलर्सचे संचालक चंद्रशेखर रोकडे तथा नक्षत्र ज्वेलसर्च संचालक तुषार काळबांधे यांनी सांगितले की, यंदा ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दागिन्यांना मागणी आहे. ग्राहक कुटुंबीयांसह खरेदीसाठी येत आहेत. श्रीराम इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक साठवणे यांनी सांगितले की, दिवाळीला एक दिवस उरलेला आहे. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी येत आहेत. लोकांना ब्रॅण्डेड वस्तू हव्या आहेत. विविध आॅफर्ससह फायनान्सची सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांची खरेदी वाढली आहे. (प्रतिनिधी)