तुळशी विवाहानंतर लग्न योग : बाजारात होणार लाखोंची उलाढालभंडारा : १६ संस्कारांमध्ये विवाहाचा संस्कार हा महत्त्वाचा विधी आहे. दोन जीवांचे व परिवारांचे मिलन घडविणारा हा विवाह संस्कार आहे. येत्या २४ नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्त सुरू होत असल्याने विवाह समारंभाचा धुमधडाका उडणार आहे. २४ नोव्हेंबर ते जुलै २०१६ या कालावधीत एकूण ७४ विवाह मुहूर्त आहे. यंदा ४४ मुहूर्त गोरज आहे. शुभमंगल सावधान हे सूर सनई चौघड्याच्या स्वरासह आता सर्वत्र गुंजणार आहेत. १३ जून २०१५ पासून विवाहाचा धुमधडाका बंद झाला होता. यंदा सिंहस्थ कुंभमेळा कोकिळावर अधिक मासामुळे विवाह मुहूर्तच नसल्याचा गैरसमज निर्माण झाला होता. त्यामुळे विवाह इच्छुकांसह त्यांच्या नातेवाईकांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. मात्र चातुर्मासही या कालावधीत आला असल्याने विवाह मुहूर्तावर त्याचा परिणाम झालेला नाही. तुळशी विवाहानंतर विवाह मुहूर्तास प्रारंभ होत असतो. यंदा डिसेंबर व फेब्रुवारी या महिन्यांमध्ये सर्वाधिक १४ मुहूर्त आहेत. विवाह मुहूर्त निवडताना अनेकजण सुट्टीचा विचार करीत असतात. मे महिन्यात शाळेला सुटी असते. मात्र यंदा वैशाख ज्येष्ठ महिन्यात अर्थात मे, जून महिन्यात शुक्राचा अस्त असल्याने विवाह मुहूर्तच नाही. दाते पंचांगांत मे महिन्यात एकच मुहूर्त दिला आहे. १३ नोव्हेंबर २०१५ ते ४ एप्रिल २०१६ या कालावधीत ४२ मुहूर्त वास्तूशांतीचे आहेत. यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे वातावरण असले तरी विवाह काही थांबण्याची शक्यता नाही. विवाह इच्छुकांना मुहूतार्चेच वेध लागलेले आहे. मुहूर्तही भरपूर असल्याने २४ नोव्हेंबरनंतर समारंभांचा धडाका सुरू होणार आहे. परिणामी बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदीविक्री होणार असल्याने लक्षावधी रुपयांची उलाढाल होईल. (प्रतिनिधी)असे आहेत विवाहाचे मुहूर्तनोव्हेंबर : २४, २६, २७, डिसेंबर : ४, ६, ७, ८, १४, १५, १६, २०, २१, २४, २५, २८, ३०, ३१जानेवारी : १, २, ३, ४, १७, २०, २१, २६, २८, २९, ३0, ३१फेब्रुवारी : १, २, ३, ४, ५, ११, १३, १६, १७, २२, २४, २५, २७, २८मार्च : १, ३, ५, ६, ११, १४, १५, २०, २१, २५, २८, ३१एप्रिल : १, २, ४, २६, १७, १९, २२, २३, २४, २६, २७, २९, ३०मे : १जुलै : ७, १०, ११, १२, १३
२४ नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्तांचा धडाका
By admin | Published: November 19, 2015 12:22 AM