भंडारा : कोरोनाकाळात विविधांगी रूपही अनेकांना पाहायला मिळाले. अशीच स्थिती मानवी जीवनात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या समारंभप्रसंगी पाहायला मिळाली. विवाह ते सत्यनारायणाची पूजा ही ऑनलाईन पद्धतीने काही ठिकाणी पार पडली. इतकेच नव्हे तर दशक्रिया व तेरवीची विधीही ऑनलाईन पद्धतीने पार पडले.
ऐकावे तर नवलच, अशी स्थिती काेरोनाने सर्वांपुढे येऊन घातली आहे. कोरोनाकाळात विवाह समारंभात ५० लोकांना परवानगी असायची. यात वधू-वराकडील ५० जणांचा समावेश असायचा. असे व अन्य धार्मिक उपक्रम ऑनलाईन पद्धतीने पार पडले. विशेष म्हणजे यात पौरोहित्य किंवा पंडित यांनी ऑनलाइन पद्धतीने हे सोहळे व समारंभ वा धार्मिक विधी मंत्रोपचाराने पूर्ण केले. आता जिल्हा लेवल वनमध्ये आल्यानंतर हळूहळू धार्मिक विधी विवाह व समारंभ होत आहेत. कोरोना नियमांचे पालन होत असले तरी अनेकांमध्ये भीतीही व्यक्त होत आहे. परंतु कोरोनाने डिजिटल पद्धतीचा अवलंब करावा लागला हे कुणालाही नाकारता येऊ शकणार नाही.
बॉक्स
सध्या कुठले विधी होत आहेत ऑनलाईन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सत्यनारायण कथेची दोनवेळा पूजा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. याशिवाय दोन लग्न समारंभ अशाच पद्धतीने पार पडले. अशा समारंभांना वेळेची व पैशाचीही बचत होत असल्याचे समोर आले आहे.
बॉक्स
पूजेला आले तरी मास्क
घरच्या घरी पूजा असली तरी पुरोहित किंवा पंडितांनी मास्क घालूनच घरात प्रवेश केला. घरच्या मंडळींनाही मास्क लावूनच पूजेवर बसविण्यात आल्याचे दिसून आले. कोरोना सांगून येत नाही. त्यामुळे रोग होण्यापेक्षा बचाव केलेला बरा असा सूरही व्यक्त करण्यात आला.
बॉक्स
काय म्हणतात विधी करणारे
कोरोना काळात घरच्या घरी धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यावेळी मंदिरातील पुजारी यांना मोठी मागणी होती. मास्क लावून जायचे व धार्मिक विधी आटोपून परत येऊ. परंतु कोरोना संक्रमणाची भीती कायम होती. हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असली तरी पूर्वीप्रमाणे सामान्यरूपाने पूजा विधी पार होणे थोडीफार अशक्य बाब वाटते.
-पंडित अभिषेक पांडे, भंडारा.