पवनी तालुक्यात व शहरात कुठेही वन्यजीव किंवा साप आढळल्यास मैत्र च्या रेस्क्यू टीमला बोलविण्यात येते. वन्यजीवाचे संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या मैत्रची टीम कोणताही विलंब न करता वन्यजीव अडकलेल्या स्थळी पोहचून मोठ्या शिताफीने साप पकडून त्यांचा नैसर्गिक अधिवासात सोडल्या जाते. याची जाण ठेऊन ग्रीनसिटी मागासवर्गीय पतसंस्थेच्या वतीने साप पकडण्याची स्टिक(टाम) शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचे वीरमाता व वीर पिता यांचे हस्ते भेट देण्यात आली.
यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष मनोज माळवी, संचालक महादेव शिवरकर, सतिश लेपसे, वीरमाता सुधाताई मोहरकर, वीर पिता अंबादास मोहरकर, मैत्रचे माधव वैद्य, महेश मठीया, गजानन जुमळे, उमेश दलाल, संघरत्न धारगावे, नामदेव मेश्राम, अमोल वाघधारे, चंदू देशमुख, पतसंस्थेचे व्यवस्थापक रामप्रसाद चौधरी, कर्मचारी व नित्यनिधी अभिकर्ता उपस्थित होते.