विनिता साहू यांचे प्रतिपादन : मांडवी शाळेत शहीद स्मृती दिन कार्यक्रमकरडी (पालोरा) : सिमेवर तैनात सैनिकांमुळे देश सुरक्षित आहे. तर पोलिसांमुळे नागरिक सुखाने जीवन जगत आहे. अनुचित प्रकार त्वरित हाणून पाडले जातात. शहिदांमुळे सर्वांचे जीवन व स्वातंत्र अबादित आहे. बेलगाव येथील शहीद पोलीस शिपाई स्व. दामोधर शंकर वळदकर यांचे उपकार कुणीही विसरू शकत नाही. त्यांना त्रिवार वंदन त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.जिल्हा परिषद पर्वू माध्यमिक शाळा मांडवी येथे शिक्षण घेवून पोलीस दलात भरती झालेले पोलीस शिपाई स्व. दामोधर शंकर वळदकर बेलगाव यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक विनिता साहू होत्या. प्रमुख अतिथीस्थानी जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपते, प्रभू फेंडर, हितेश सेलोकर, पं.स. सदस्या सुजाता फेंडर, नितू सेलोकर, केंद्र प्रमुख घुमुरकर, कारधाचे ठाणेदार रमेश इंगोले, गोंदियाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील, सरपंच सुनंदा लुटे, सरपंच राजेश मारबते, पोलीस पाटील दुर्वास कोटांगले, रामू वाट, विलास केजरकर, अपेक्षा मेश्राम, गोपिका वळदकर, शंकर वळदकर, मंजुषा वळदकर, मंजुषा वळदकर, उपसरपंच मंजुषा बुजाडे, तंमुस अध्यक्ष युवराज मेश्राम, संजीव कुकडे, पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी, शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.शहिदांनी केलेले उपकार परतफेड करता येत नाही, मात्र त्यांचे कार्य सदैव स्मरणात ठेवून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविण्याचे कार्य नागरिकांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य उत्तम कळपते यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार शाळेचे प्राचार्यानी मानले. यावेळी गावातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते. दामोधर वळदकर अमर रहे घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली. (वार्ताहर)
शहिदांमुळे सर्वांचे जीवन सुरक्षित
By admin | Published: October 22, 2016 12:30 AM