लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोना काळात सरासरी आलेल्या भरमसाठ विजेच्या बिलाचे सध्या विद्युत विभागाकडे नियोजन नसल्याचे समजते. त्यात मागील चार महिन्याचे लागून आलेले बिल व त्यातील भरमसाठ रकमेने सर्व नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना काळात मीटर रिडिंगचे नोंद विभागाने केली नाही. मात्र चालू महिन्यात विद्युत विभागाने सरासरी रिडिंगचे बिल पाठवले आहे. प्रत्येकाच्या बिलातील रक्कम ही किमान दोन हजाराच्या वर दिसून येत आहे. प्रत्येक ग्राहकांची धाव विद्युत कार्यालयाकडे होत आहे.कोरोना प्रादूभार्वाच्या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कष्टकरी नागरिक दिनांक २४ मार्चपासून आज जवळपास तीन महिने घरी बसून आहेत. त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्गच बंद आहेत, काहीतरी मार्ग काढून या संकटाच्या काळात आपले जीवन जगत आहे.ज्यांची रोजची हातावरची पोट आहेत, ज्यांचे मासिक उत्पन्न सर्व खाण्यामध्येच खर्च होत असते. जवळ काहीच शिल्लक नसते. त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद आहेत. यामुळे या सर्वसामान्य नागरिकांचे खायचे हाल होत असल्याने घरगुती विद्युत बिल माफ करावे तसेच याविषयाची दखल घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचा वतीने महावितरण उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. याविषयी उर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सुधाकर कारेमोरे, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखा प्रमुख वामनराव पडोळे, संतोष साखरवाडे, प्रणय त्रिभुवनकर, सतिश बन्सोड, पुष्पक त्रिभुवनकर, दिनेश बन्सोड सह शिवसैनिक उपस्थित होते.लाखांदूर : कोरोनाविषाणू महामारीमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. या काळात सर्वत्र संचारबंदी व जमावबंदी लागू असल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. मात्र या संकटाच्या काळात वीज कंपनीने घरगुती वीज ग्राहकांना अवाजवी वीज बिल देऊन जनतेची आर्थिक पिळवणूक चालविण्याचा ठपका ठेवीत लॉकडाऊन मधील घरगुती वीज बिल माफ करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. सदरचे निवेदन २२ जून रोजी जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात येथील तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.सध्या शेती हंगामाला वेगाला असतांना शेतकऱ्यांना विविध संकटाला सामोरे जावे लागत असतांनाच विज कंपनीकडून अवाजवी बिल प्राप्त झाल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर परिस्थितीची दखल घेऊन शासनाने तात्काळ घरगुती वीज बिल माफ करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.लाखांदूरचे नायब तहसीलदार देविदास पाथोडे यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देतेवेळी माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, सुधीर खोब्रागडे, चंद्रशेखर मेश्राम, दिलीप रामटेके, जगदीश बगमारे, सोमा डोंगरे, राहुल लोणारे, वामन शेंडे अरुण घोडीचोर यासह अन्य नागरिक उपस्थित होते.बील भरणे नागरिकांसाठी आव्हानलॉकडाऊन काळात काळात तालुक्यात मजुरीची कामे बंद होती. मजुरीविना कुटुंबांना आर्थिक संकटाला सामोरे जावेलागले. प्रपंच चालविणे कठीण असताना वीज कंपनीने अवाजवी घरगुती बील पाठविले. तीन महिन्यांचे वीज बिल देताना सरासरी वीज दरानुसार देण्यात आल्याने संबंधित वीज बिलाचा भरणा करणे जनतेपुढे मोठे आव्हान ठरले आहे.
भरमसाठ वीज बिलाने मोडले नागरिकांचे कंबरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 5:00 AM
कोरोना प्रादूभार्वाच्या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कष्टकरी नागरिक दिनांक २४ मार्चपासून आज जवळपास तीन महिने घरी बसून आहेत. त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्गच बंद आहेत, काहीतरी मार्ग काढून या संकटाच्या काळात आपले जीवन जगत आहे.
ठळक मुद्देघरगुती वीज बिल माफ करा : प्रशासनाला निवेदन, तुमसर-लाखांदुरात वीज ग्राहकांमध्ये रोष