आॅनलाईन लोकमततुमसर : पेटत्या दिव्याची वात सुसुंद्रीने (‘मोल’) नेल्याने ज्वलनशिल पदार्थांने पेट घेतला. यात क्षणार्धात आगीने रुद्ररुप धारण केल्याने घरातील अन्नधान्यासह साहित्य जळून खाक झाले. ही घटना तालुक्यातील तामसवाडी येथे मंगळवारला रात्री ८ वाजताच्या सुमारास देवदास यादवराव ईखार यांच्याकडे घडली. या आगीत जवळपास अडीच लक्ष रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.सायंकायच्या सुमारास तुळशीसमोर दिवा लावल्यानंतर जेवणही आटोपले. यादरम्यान सुसुंद्रीने तुळशीपुढे ठेवलेल्या दिव्याची वात तोंडात घेवून पळत असताना ती वात ज्वलनशिल पदार्थावर पडली. आगीच्या कवेत संपूर्ण सामान जळून खाक झाले. घटनेची माहिती तुमसर पोलिसांना देताच न.प.च्या अग्निक्षमन बंबाला पाचारण केले. आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी लाखोंचे नुकसान झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ईखार कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांची आहे.
तामसवाडीत घराला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:03 AM
पेटत्या दिव्याची वात सुसुंद्रीने (‘मोल’) नेल्याने ज्वलनशिल पदार्थांने पेट घेतला. यात क्षणार्धात आगीने रुद्ररुप धारण केल्याने घरातील अन्नधान्यासह साहित्य जळून खाक झाले.
ठळक मुद्देअडीच लाखांचे नुकसान : अन्नधान्यासह साहित्य जळून खाक