पावसाळ्याच्या दिवसांत तालुक्यातील वैनगंगा व चुलबंध नदीला येणाऱ्या पुराने बहुतांश नदीकाठावरील गावे प्रभावित होतात. पुराच्या दरम्यान स्थानिक लाखांदूर तालुका नजीकच्या भंडारा, गोंदिया व गडचिरोली या तिन जिल्ह्यांशी संपर्क तुटतो. तथापि या पुरामुळे वैनगंगा व चुलबंध नदीकाठावरील तालुक्यातील जवळपास २८ गावांत पूरपरीस्थिती निर्माण होत असल्याची माहिती आहे.
पावसाळ्यात तालुक्यातील वैनगंगा व चुलबंध नदीत येणाऱ्या पुरामुळे तालुक्यातील आवळी व बोथली (जुनी) हे दोन्ही गाव पुराच्या पाण्याने वेढलेले असते. त्यामुळे या दोन गावांना रेड झोन घोषीत करण्यात आले आहे. तथापि दरवर्षी पावसाळ्यात ही दोन्ही गावे पुराने बहुतांश रुपात प्रभावित होत असल्याने शासनाने या दोन्ही गावांचे पुनर्वसन केले आहे. मात्र पुनर्वसनाअंतर्गत शासनाद्वारे अपर्याप्त स्वरुपात सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने अद्याप या गावांतील काही नागरीक पुनर्वसित गावांत स्थानांतरीत झाले नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत तालुक्यात निर्माण पूरपरीस्थितीत नागरीकांच्या बचावासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागा अंतर्गत तालुक्यातील पूर नियंत्रण विभागाला दोन बोट व अन्य सामुग्री उपलब्ध करण्यात आली आहे. तथापि, यंदा तालुक्यात मुसळधार पाऊस न आल्याने अद्याप पूरजन्य परीस्थिती निर्माण झाली नाही. यंदा तालुक्यात पावसाळ्याच्या दरम्यान तालुक्यात केवळ एकदा व एकदा मासळ क्षेत्रात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. या स्थितीत तालुक्यातील वैनगंगा व चुलबंध नद्यांना पुरपरीस्थिती येऊ शकणार नसल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.
310721\img-20210731-wa0042.jpg
लाखांदुर पुर व्यवस्थापन विभागालाल देण्यात आलेली बचाव सामुग्री