सभेला मुख्य मार्गदर्शक म्हणून काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा महासचिव अनिक जमा पटेल, प्रशांत देशकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक इंटकचे जिल्हा महासचिव महेंद्र वाहाणे यांनी केले. त्यांनी जिल्ह्यातील गोरगरीब मजुरांच्या अडचणी व घरकूलविषयक समस्या मांडल्या. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन महेंद्र वाहाणे यांनी तर, आभार प्रदर्शन संजूताई गोसेवाडे यांनी केले. कार्यक्रमाला सोहेल अहमद, शाहीन मून, विजय बोकडे, मेहमूद खान, प्रदीप मेश्राम, अनुपचंद नंदेश्वर, चाँद डोंगरे, प्रमोद शिवणकर, संदीप कोरे, राजेश बालपांडे, रत्नदीप चव्हान, संदीप फेसलकर, सुधीर मेश्राम, राकेश सेलोकर, विनायक दिवटे, दिलीप मेश्राम, रामचंद्र बाळबुधे, नत्थुजी खंडाईत, नरेशचंद्र कावळे, स्नेहा भोवते, मनीषा चव्हाण, संजूताई गोसेवाडे, किरण साखरे, विद्या साखरे, रंजना लांजेवार, सीमा थोटे, सोनल सेलोकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.