शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

विद्यार्थ्यांच्या संवादात जिल्हाधिकारी रमले बालपणीच्या आठवणीत

By admin | Published: June 28, 2016 12:35 AM

शाळेचा पहिला दिवस असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रगत शाळांमधील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार होते.

मुख्यमंत्र्यांशी संवाद टळला : एनआयसीतील तांत्रिक बिघाडाचा फटकाभंडारा : शाळेचा पहिला दिवस असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रगत शाळांमधील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार होते. मात्र, एनआयसीत तांत्रिक बिघाड झाल्याने येथील विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे हिरमुसले; मात्र प्रसंगावधान साधून जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी विद्यार्थ्यांशी दीड तास वेळ घालवून हितगुज साधला. यावेळी जिल्हाधिकारी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वत: विद्यार्थी दशेतील अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले.लाखनी तालुक्यातील खराशी व तुमसर तालुक्यातील डोंगरला येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये शासकीय मदतीची वाट न बघता, येथील शिक्षकांनी स्वमेहनतीवर शाळांमधून विद्यार्थ्यांना प्रगत शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली. यासोबतच येथील शिक्षकांनी अन्य शिक्षकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या दोन्ही शाळांमधून विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण आदर्श शाळेतील शिक्षणासमान आहे. साने गुरूजींच्या स्वप्नातील शाळा बघायची असल्यास या दोन्ही शाळांना भेट दिल्यास त्याचा अनुभव येतो.या शाळांमधून विद्यार्थ्यांना दिल्या जाणारे शिक्षण व विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती. याची महती शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेच्या पहिल्या दिवसीच राज्यातील प्रगत शैक्षणिक धोरण राबविणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. तसे पत्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाने खराशी व डोंगरला शाळांना पाठविले. नियोजनानुसार आज मुख्यमंत्री विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी दोन्ही शाळेतील विद्यार्थी सकाळी ११ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात पालक व शिक्षकांसह उपस्थित झाले. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधता येणार असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. ठरल्याप्रमाणे वेळ जवळ आली. मात्र त्याचवेळी नॅशनल इंफारमेशन सेंटरमधील पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे बराच वेळ त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातून संपर्क साधण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांशी तांत्रिक बिघाडामुळे संपर्क होऊ शकला नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे हिरमुसले. ही बाब लक्षात येताच जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी त्यांच्याशी दीड तास संवाद साधला. आपल्या शाळेत सुविधा आहेत का, शाळेत शौचालय आहे का, गणवेश व शैक्षणिक साहित्य मिळाले का यापासून ज्ञान रचनावादी शिक्षण मिळते अशी आस्थावाईक चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध कवितांचे वाचन करुन उपस्थितांना आपल्या ज्ञानाची व पाठांतराची साक्ष दिली. श्रृती नावाच्या विद्यार्थींनीने तर पावसावर तात्काळ कविता लिहून वाचून दाखविली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तिचे जाहिर कौतुक केले. यावेळी शिक्षणाधिकारी के.झेड. शेंडे, प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभयसिंह परिहार यांचेसह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)संवादात उलगडला ज्ञानाचा खजिनाभारताचे पहिले राष्ट्रपती कोण, भारतरत्न पुरस्कार विजेते कोण, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती, सर्वाधिक जिराफ कोणत्या देशात पहायला मिळतात, भारतातील नोबल पुरस्कार विजेते कोण, अजिंठा-वेरुळ लेण्या कुठल्या जिल्ह्यात आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यपाल, शिक्षणमंत्री कोण? अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांना अचूक व विश्वासाने उत्तरे देत विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञानाची चूणूक दाखविली. सोमवारला शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी धीरजकुमार व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधला.