भंडारा : भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. मिळालेल्या स्वातंत्र्याची ज्योत सदैव तेवत ठेवण्यासाठी शासनाने देशभरात हुतात्मा स्मारकांसोबतच स्वातंत्र्याचे स्मारकही उभारले. असेच स्मारक जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरातही उभारण्यात आले. परंतु हे स्मारक आजघडीला उकिरड्यावर असल्याचे दिसून येते. विशेषत: मुख्य कार्यालये असलेल्या परिसरातच हे स्मारक असल्याने याकडे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष असणे गंभीर बाब आहे. तहसील कार्यालयाला लागून असलेल्या जुन्या जिल्हा उद्योग केंद्रांच्या उमारतीजवळ हे स्मारक उपेक्षित आहे. घाणीच्या विळख्यात सापडलेल्या या स्मारकाकडे जिल्हा प्रशासन लक्ष देणार काय? (प्रतिनिधी)
भारतीय स्वातंत्र्याचे स्मारक उकिरड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2017 12:20 AM