शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

सहा शहिदांच्या स्मृती तुमसरकरांच्या कायम स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:17 PM

भारतीय स्वातंत्र्य संग्राम चळवळीत तुमसर शहरासह तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी शहीद दिनी आंदोलन करून प्राणाचे बलिदान दिले. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्वात जास्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची शासन दप्तरी नोंद आहे. तुमसर स्वातंत्र्य युद्धातील मुख्य केंद्र होते.

ठळक मुद्देशहीद दिन विशेष : स्वातंत्र्यापूर्वीच १९२९ साली फडकला तिरंगा, महात्मा गांधींनी दिली होती भेट

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भारतीय स्वातंत्र्य संग्राम चळवळीत तुमसर शहरासह तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी शहीद दिनी आंदोलन करून प्राणाचे बलिदान दिले. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्वात जास्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची शासन दप्तरी नोंद आहे. तुमसर स्वातंत्र्य युद्धातील मुख्य केंद्र होते. तुमसरातून धान्य बाहेर जात होते ते जाऊ नये म्हणून येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी सत्याग्रह सुरू केला होता. ही ऐतिहासिक घटना तुमसरात घडली. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. तुमसरात सहा जण शहीद झाल्याची घटना देशात गाजली.धान्य विरोधात बापूराव पेंढारकर, कृष्णअप्पा दाजोट्या व छोटू पहेलवान यांना अटक करून त्यांच्यावर ब्रिटीशांनी खटला भरला. प्रसिद्ध बॅरिस्टर नरकेसरी अभ्यंकर यांनी पुढाकार घेऊन त्यांची सुटका केली. महात्मा गांधीनी सुरू केलेल्या अहसहकार आंदोलनात कर्मवीर बापूजी र.रा. पाठक यांनी वकीली सोडली. राष्ट्रीय शिक्षण मिळावे म्हणून तुमसरात लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना १९२० मध्ये केली. राष्ट्रीय शाळेची जबाबदारी माकडे गुरूजीकडे देण्यात आली. येथे स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे शिक्षण बुधराम गुरूजी, वैरागडे गुरूजी, जोशी गुरूजी, मो.प. दामले, रामअण्णा गुरूजी सातत्याने दिले. त्यामुळे तुमसर व तुमसर विभागात इंग्रजांच्या विरोधात अनेक चळवळींना धार आली.महाराष्ट्रात येण सत्याग्रहात तुमसरचे विनायक पेंढारकर यांना ३ महिन्याची सक्त मजूरीची शिक्षा झाली. येवरडा तुरूंगात नियमांना विरोध केल्याने त्यांना शिक्षा सुनाविण्यात आली. प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. १९२३ मध्ये झेंडा सत्याग्रहात तुमसरचे मो.प. दामले, लक्ष्मण समरीत, सिहोऱ्याचे गोपीचंद पाटील तुमसर यांनी सत्याग्रहात भाग घेतला. सायमन कमीशनवर बहिष्कार संदर्भात सन १९२७ मध्ये महात्मा गांधी, जमनालाल बजाज, डॉ. लोहीया तुमसरात आले होते. त्यांचा मुक्काम सेठ फत्तेचंद मोर यांच्या घरी होता. महात्मा गांधीनी राष्ट्रीय विद्यालयाला भेट दिली.तुमसर नगरपरिषदेवर तिरंगा झेंडा फडकविण्याकरीता सेठ नरसिंगदास मोर यांनी २ आॅक्टोबर १९२९ ला नोटीस दिली होती. त्याकरिता झेंड्याकरीता युद्धमंडळ स्थापन करण्यात आले होते. मो.प. दामले, सचिव वासुदेव कोंडेवार तथा सदस्यांनी मोर्चेबांधणी केली. वामनराव जोशी यांचे हस्ते तिरंगाध्वज नगर परिषदेवर प्रथमच फडकला.१९३० मध्ये जंगल सत्याग्रहात पोलिसांनी लाठीचार्ज व धरपकड केली. पोलीस घोडे व हत्तीवर बसून आणण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या वानरसेना स्थापन करण्यात आल्या होत्या. १० आॅगस्ट १९४२ रोजी पोलिसांनी १४ नेत्यांविरोधात अटक वारंट काढला होता. काही नेते भूमिगत झाले होते. तुमसर पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्ते तिरंगाध्वज लावण्याकरिता गेले होते. मिरवणूक अडवून पोलिसांनी गोळभबाळ केला त्यात श्रीराम रामजी धुर्वे, भदुजी रामाजी नोंदासे, श्रीहरी काशीनाथ फाये करडी, पांडूरंग परसराम सोनवाल, भुवाजी बालाजी वानोरे, राजाराम पेकू धुर्वे हे सहा जण मृत्युमुखी पडले. ब्रिटीशांनी सेनेला तुमसरात पाचारण केले होते. दामले गुरूजी, वासुदेव कोंडेवार, आनंदराव चकोले, नारायणराव कारेमोरे, भोले यांना पकडून तुरूंगात डांबले.सन १९९० मध्ये भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद तुमसर येथे आले होते. त्यांनी सहा शहीदांच्या स्मारकाकरिता जागा देवून शहीद स्मारकाचे भूमीपूजन केले होते. तुमसरात मोतीलाल नेहरू, महात्मा भगवान दासजी पंडित सुंदरलाल, आचार्य कृपलानी, डॉ. पट्टीमोसिता रामय्या, जयप्रकाश नारायण, क्रांतीवीर नाना पाटील, काकासाहेब गाडगीळ आदी नेत्यांनी भेटी दिल्या आहेत.