चिचाळ : स्त्रीयांनामध्ये काम करण्याची जिद्द, चिकाटी आहे त्यांना गृहकामाबरोबरच समाजकारण व राजकीय क्षेत्रात सहभाग घ्यावा. कवित यशवंतांनी आईची थोरवी गातांना म्हटले आहे. 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी' अगदी खरे आहे ते मातेच्या प्रेमाची कशाशीही तुलना नाही, शासनाने स्त्रियांना जरी आरक्षण दिले असले तरी तिला रिमोट द्वारे फिरवू नका तिला घर कामात मदत करून स्त्रियांना सहकार्य करा, असे प्रतिपादन सभापती रेखा भुसारी यांनी केले. चिचाळ येथील महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद भंडारा व एकात्मिक बाल सेवा योजना प्रकल्प पवनी व ग्रामपंचायत चिचाळ यांचे संयुक्त विद्यमाने बीटस्तरीय महिला व बालकांना मार्गदर्शन शिबिरात बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षा राजेश्वरजी सामृतवार, उद्घाटक महिला व बाल कल्याण सभापती रेखा भुसारी तर प्रमुख अतिथी सरपंचा उषा काटेखाये, सरपंचा आकोट दुर्गा भुरे, सभापती पंचायत समिती पवनी चंद्रकला गजभिये, भगत, किसना भानारकर, मनोज वैरागडे, मिना घटारे, रिना लांजेवार, दिलीप रामटेके तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. कांचन म्हशाखेत्री, पर्यवेक्षिका कोंढा एस. एस. हेडावू आदी उपस्थित होते. शिबिरात सांस्कृतीक कार्यक्रमात अंगणवाडीतील चिमुकल्यांचे नृत्य एकांकी नाट्य सादर करण्यात आले तर विद्यार्थ्यांना बक्षीस देवून गौरविण्यात आले. प्रास्ताविक पर्यवेक्षिका शिला हेडावू, संचालन ममिता लोहकर तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका पाथोडे यांनी केले. (वार्ताहर)
पुरूषांनी महिलांना सहकार्य करावे
By admin | Published: February 05, 2015 11:04 PM