सोईओंना निवेदन : न्याय देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत विशेष शिक्षक म्हणून लाखनी गटसाधन केंद्रात कार्यरत असलेल्या नरेंद्र मनिलाल सेवक या अंध शिक्षकाला जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयक मानसिक त्रास देत आहे. या आशयाची तक्रार या शिक्षकाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे नरेंद्र सेवक या विशेष शिक्षकाला दोन्ही पदावरील व्यक्तीकडून क्षुल्लकशा कारणावरून मानसिक त्रास देण्यात येत असतो. तसेच कामाविषयी रुपरेषा समजावून दिली जात नाही. तसेच खोेटे आरोप लावून त्यांना बोलले जाते, असा आरोपही सेवक यांनी केला आहे. माझ्यावरील मानसिक त्रास कमी करून न्यायदेण्यात यावा अशी मागणी सेवक यांनी निवेदनातून केली आहे. सेवक यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. त्यांना कुठल्याच प्रकारचा मानसिक त्रास दिला जात नाही. कामाची रूपरेषा निर्णयाप्रमाणे सांगितली जाते. -मुकेश बन्सोड, जिल्हा समन्वयक,सर्व शिक्षा अभियान, भंडारा.
अंध शिक्षकाचा मानसिक छळ
By admin | Published: June 02, 2017 12:22 AM