शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

पारा @ ४४ ; नवतपापूर्वीच तापतोय भंडारा

By admin | Published: April 18, 2017 12:37 AM

उष्णतेची लाट दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. ही शक्यता तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे.

भाजीपाल्यांचे दरही वाढले : उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल, रस्ते निर्मनुष्यइंद्रपाल कटकवार भंडाराउष्णतेची लाट दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. ही शक्यता तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे. दरवर्षी मे महिन्यात पारा ४४ अंशांच्यावर पोहोचतो. मात्र यंदा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या प्रारंभीच पारा ४५ अंशांवर पोहोचला आहे. नवतपापूर्वीच भंडारा जिल्हा तापू लागला आहे. यंदाचा उन्हाळा जीवघेणा आहे की काय? असे वाटू लागले आहे. सकाळी ९ वाजतापसून सुरू झालेली उन्हाची प्रखरता सायंकाळी ५ वाजतापर्यंत कायम राहत असल्याने याचा परिणाम जनजीवनावर बघायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र उन्हाची तीव्रता जास्त व एप्रिल महिन्यातच अनुभवायला मिळत आहे. २२ मार्च हा अयनदिन म्हणून ओळखला जातो. यादिवसापासुन सुर्य हा पृथ्वीच्या मधोमध असतो तथा याच दिवसापासून सुर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो. एप्रिलचा उत्तरार्ध सुरू होताच सूयार्ने अक्षरश: आग ओकण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम राजस्थान व गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मागील दोन दिवसांपासून पारा सातत्याने चढत आहे. रविवारी भंडाऱ्याचे तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सोमवारलाही पारा ४४ अंशांवर होता. उष्णतेच्या लाटेने नागरिकांची होरपळ होत असून, बुधवारपर्यंत ही लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक महत्त्वाची कामे सकाळीच उरकून घेण्यास प्राधान्य देत आहेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका जास्त असतो. यावषीर्चा उन्हाळा मागील सर्व विक्रम मोडीत काढणार, असा कयास व्यक्त केला जात होता. यावर्षी ६ मार्चला पारा ४३.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला. मागील वर्षी म्हणजे मे २०१६ मध्ये पाऱ्याने चाळीशी ओलांडत १४ मे रोजी ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र यावर्षी एक महिन्यापूर्वीच पारा ४५ अंशांवर गेल्याने मे महिन्यात उन्हाची तीव्रता किती राहील याचा विचार न केलेलाच बरा. मागील वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान ४०-४२ अंश सेल्सिअसच्या घरात होते. सन २०१५ मध्ये २१ मे रोजी तापमान ४६.५ अंश नोंदविण्यात आले होते. यावर्षी तापमानाचा हा उच्चांक मोडीत निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.मागील चार दिवसांपासून मात्र उष्णतेची लाट पसरल्याने तापमापीतील पारा झपाट्याने वर सरकला आहे. शुक्रवारी भंडाऱ्याचे तापमान ४३.५, शनिवारी ४४ तर रविवारी पारा ४४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला. रविवारी व सोमवारी दुपारी उन्हाची प्रखरता एवढी होती, की शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता. रविवार हा भंडाराचा आठवडी बाजाराचा दिवस होता, परंतु सायंकाळी ६ वाजतानंतरच बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून आली. नवतपा २५ मे पासूनसंपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याने नागरिकांची होरपळ होत असून, उन्हाच्या दाहकतेने जीवाची काहिली होत आहे. मे महिन्याच्या २५ तारखेपासून नवतपाला प्रारंभ होणार आहे. नवतपा प्रारंभ व्हायला सव्वा महिन्याचा कालावधी शिल्लक आहे परंतु भंडारेकर नवतपातील उन्हाची दाहकता एप्रिल महिन्यातच अनुभवत आहेत.