शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
3
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
4
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
5
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
6
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
7
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
8
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
10
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
11
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
12
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
13
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
14
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
15
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
16
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!
17
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
18
"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'
19
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
20
मुंबईचा 'संकटमोचक' झाला सज्ज! निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा लाडला आनंद

पांदण रस्त्याच्या कामावर ‘गोदरीमुक्ती’चा संदेश

By admin | Published: February 06, 2017 12:25 AM

हागणदारीमुक्त जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी योजना करीत आहेत.

पवनारखारीत रोहयो कामावर सभा : उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शनभंडारा : हागणदारीमुक्त जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी योजना करीत आहेत. गुडमॉर्निंग पथक भल्या पहाटेच गावात दाखल होऊन उघड्यावर जाणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन शौचालय बांधण्याचा संदेश देत आहे. यात आता रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या मजुरांना शौचालय बांधण्याचे व वापरण्याचा सल्ला दिल्या जात आहे. हा एक महत्वपूर्ण मार्ग प्रशासनाने निवडला आहे. स्वच्छता मिशन कक्षच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुका ओ.डी.एफ. अंतर्गत हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासन आता उघड्यावर जाणाऱ्यांशी दोन हात करण्यास सज्ज झाले आहे. उघड्यावर शौचास जात असल्याने त्या माध्यमातून निर्माण होणारी दुर्गंधी व याचे आरोग्यावर पडणारे विपरीत परिणाम याची माहिती या कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना दिल्या जात आहे. अनेकांना त्यांनी दिलेल्या उपदेशाचे महत्त्व पटल्याने शौचालय निर्मितीसाठी पुढाकार घेण्यात आल्याची फलश्रूती दिसू लागली आहे. ग्रामीण स्तरावर नागरिकांना गावात उपदेश देण्याचा प्रकार आजतागायत बघितला. मात्र आता ग्रामस्थ रोजगार हमी योजनेच्या कामावर एकत्र राहत असल्याने तिथेच त्यांना कामातून वेळ काढून शौचालय बांधण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. सध्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पांदण रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहेत. या कामावर असलेल्यांना देण्यात आलेले मार्गदर्शन शौचालय बांधण्यासाठी व गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी महत्वाचे ठरत आहे. मार्च पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी सज्ज झाले आहेत. त्यांना ग्रामस्थांकडूनही शौचालय बांधकाम करण्यासाठी सहकार्य मिळत असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)शौचालय बांधा, आरोग्य जपा विवाहित महिलेच्या गळ्यात असलेले मंगळसूत्र ज्या प्रमाणे सौभाग्याचे लेणे मानले जाते त्याचप्रमाणे शौचालय महिलेच्या इज्जतीचा दागिना असल्याचे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी तुमसर पंचायत समिती अंतर्गत पवनारखारी येथे रोजगार हमी योजनेच्या कामावर ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी सरपंच कविता बोमचेर, ग्रामपंचायत सदस्य हरिप्रसाद गाढवे, संजय बोमचेर, राजेश येरणे, पल्लवी तिडके, शशीकांत घोडीचोर, पौर्णिमा डुंभरे, वर्षा दहिकर, राजेश मेश्राम, विनोद मेश्राम, विनोद सयाम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी गाव हागनदारीमुक्त करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा व शौचालयाची पाहणीपवनारखारी हागणदारीमुक्त करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी सर्व प्रथम ग्रामपंचायत पदाधिकारी यांचेशी संवाद साधला. शौचालयाबाबतची स्थिती जाणून घेतली व शक्य तितक्या लवकर शौचालयाचे निर्माण करून गाव हागणदारीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर रोहयो कामावर महिला पुरुषांशी सभेच्या माध्यमातून संवाद साधून स्वच्छतेच्या सुविधेचे बांधकाम करून व वापर करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पवनारखारी येथे ज्या कुटुंबंनी शौचालयाचे काम केले त्यांच्या घरांना भेटी देवून शौचालयाचीपाहणी केली व ज्यांनी बांधकाम केले नाही त्यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेवून शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले. शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन गाव निरोगी बनविण्यासाठी ग्रामस्थ आता पुढाकार घेऊ लागले आहेत.