शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
2
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
3
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
4
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
5
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
6
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
8
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
9
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
10
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
11
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
12
Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!
13
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
14
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "कारवाई होणारच, हा लढा महिलांच्या सन्मानासाठी"; शायना एनसी यांचे रोखठोक प्रत्युत्तर
16
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
17
आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!
18
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
19
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
20
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

भ्रमणध्वनीवर उपायांचे संदेश

By admin | Published: September 21, 2015 12:24 AM

धान पिकावरील किडींचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनीवर उपाय योजनाचे संदेश पाठविले जात आहेत.

औषधांचा पुरवठा नाही : धानावर किडींचा प्रादुर्भाव, शेतकरी त्रस्तलोकमत विशेषरंजीत चिचखेडे चुल्हाड (सिहोरा) धान पिकावरील किडींचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनीवर उपाय योजनाचे संदेश पाठविले जात आहेत. परंतु या किडीवर रामबाण उपाय ठरणारी औषध ग्राम कृषी विभागात उपलब्ध करण्यात आली नाही. यामुळे सिहोरा परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.वैनगंगा आणि बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या सिहोरा परिसरात धानाचे प्रमुख पीक आहे. या पिकाला चांदपुर जलाशय आणि सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची संजीवनी मिळाली आहे. अंदाजे १२ हजार हेक्टर आर शेत शिवारात धानाची रोवणी करण्यात आली आहे. हलक्या प्रतीचे धानाचे पीक गर्भात आले असून अन्य धानाचे पीक याच उंबरठयावर आहे. आधी निसर्गाने पावसाची दगाबाजी दिली आहे. आता या धानाला शासनाची अवकृपा लागली आहे. धानाचे पिक गर्भात आले असतांना खोडकिडा, गादमाशी आणि कडपा या किडींचा प्रादुर्भावाने शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांची धाकधुकी वाढली आहे. किडीचा नायनाट करणाऱ्या औषधांची शोधाशोध शेतकरी व त्यांचे कुटूंब करीत आहे.खाजगी कृषी केंद्रात औषध खरेदीसाठी शेतकऱ्यांची रांग लावण्यास सुरुवात झाली आहे. परंतु शेतकऱ्यांचे शिलेदार बेपत्ता झाली आहेत. धानपिकावरील किडीचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनी वर उपाय योजना एसएमएस मधून सांगितल्या जात आहेत. दिवसभर एकामागे एक असे संदेश प्राप्त होत आहेत. असे संदेश वाचून शेतकऱ्यांची डोकी खाजवायला लागली आहेत. या संदेशात औषध व उपाय योजनांची माहिती असली तरी, औषध स्वस्त दरात उपलब्ध असल्याचे ठिकाण मात्र सांगण्यात येत नाहीत.शेतकऱ्यांचे हित आणि उपाय योजनाचे मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरीय कृषी विभाग, तथा जिल्हा परिषदेचा कृषी विभाग पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहे. सिहोऱ्यात राज्याचे अखत्यारित मंडळ कृषी कार्यालय संचालित होत आहे. शेतकऱ्यांचे हक्काचे दोन्ही कार्यालय आहेत. या कार्यालयाचे यंत्रणेवर शासन शेतकऱ्यांचे हितासाठी महिन्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतु या खर्चित निधीचा उपयोग होत नाही. धान पिकांचे किडीच्या प्रादुर्भावाने अतोनात नुकसान सुरु झाले आहे. या धानाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु झाली आहे. या धानाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु झाली आहे. संदेश वाचन केल्यानंतर शेतकरी थेट औषधीकरिता मंडळ कृषी कार्यालयाचे दरवाज्यावर थाप देत आहेत. अद्याप औषधांचा पुरवठा करण्यात आला नाही असे एकच उत्तर शेतकऱ्यांना प्राप्त होत आहेत. या उत्तराने शेतकऱ्यांची समस्या सुटणार नाही. समस्या व अडचणी सोडविणारी मेट्रो धावली पाहिजे.सिहोऱ्याच्या मंडळ कृषी कार्यालयाने मे महिन्यात शेतकऱ्यांचे हितासाठी औषध व स्प्रे पंप अन्य उपकरणे पुरवठा करणारा प्रस्ताव दिला आहे. तब्बल ५ महिन्यांपासून या प्रस्तावावर शासनाने निर्णय घेतला नाही, धान पिकावर रामबाण ठरणारी औषधाची पुरवठा करण्यात आला नाही. खाजगी कृषी केंद्रावर या औषधी उपलब्ध असतांना शासनाच्या कृषी विभागात औषध उपलब्ध नाही. ही बाब शेतकऱ्यांना खटकणारी आहे.धानाचे उत्पादन वाढणारसिहोरा परिसरात धान पिकाला संजीवनी चांदपुर जलाशयात २७ फुट पाण्याची साठवणुक झाली असून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प नदीपात्रातून पाण्याचा उपसा करीत आहे. यामुळे धान पिकाला गरजेनुसार पाणी मिळणार असले तरी, धान पिकावरील किडींचा नायनाट करण्यासाठी कृषी विभागाने औषधांचा आधार दिला पाहिजे.सिहोरा परिसरात धानावरील किडींचा प्रादुर्भावाने शेतकरी हैराण झाली आहेत. कृषी विभाग (राज्य) आणि कृषी कृषी विभाग (जि.प.) दोन्ही विभागात अद्याप औषधांचा पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे शेतकऱ्यांची लुट होत आहे.- अरविंद राऊत,सदस्य पंचायत समिती, सिहोरामंडळ कृषी कार्यालयाला औषध व अन्य साहित्य पुरवठा करण्यासाठी शासनाला मे महिण्यात प्रस्ताव दिला आहे. पंरतु अजूनपर्यंत औषध साहित्य प्राप्त झाले नाही. - एस. जी. उईके,मंडळ कृषी अधिकारी सिहोरा