बॉक्स
का वाढले दर...
मागणी अधिक आणि पुरवठा कमी असला की कोणत्याही वस्तूचे दर वाढतात. परंतु, गणेशोत्सवाचा काळ असल्याने मिठाईचे दर थोडे वाढणे साहजिकच आहे. परंतु, आता प्रत्येक प्रकारच्या मिठाईचा भाव वाढलेला नाही. सणानंतर जुन्याच पद्धतीने मिठाईची किंमत सुरू राहील.
स्वीट मार्ट चालक
कोट
जिल्ह्यात गणेशोत्सवात मिठाईची मागणी वाढली आहे. दिवाळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मिठाईला मागणी असते. दूध, साखरेबरोबरच मिठाईसाठी इतर वस्तूंची गरज असते. डिझेल, पेट्रोलही महागले आहे.
स्वीट मार्ट चालक
दरांवर नियंत्रण कुणाचे?...
मिठाईचा दर सरकार नाही तर दुकानदार स्वत:च ठरवितात. मिठाईच्या दरावर कुणाचेही नियंत्रण नाही. हे दर कमी जास्त होत राहतात. परंतु, या दरावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने स्वीट मार्टचालक ग्राहकांची लूट करीत आहेत.
ग्राहक म्हणतात..
कोट
बळिराजाकडून दूध खरेदी करताना ३५ ते ४० रुपये लिटरने घेतले जाते. परंतु, मिठाईसाठी मात्र दुकानात गेल्यावर ३५० रुपये किलोच्या दराने मिठाई घ्यावी लागत आहे. ग्राहकांची लूट होत असतानाही प्रशासनाची कारवाई होत नाही.
अमित शेंडे, खरबी
कोट
आम्हाला मिठाई खरेदी करताना दुकानदार सांगेल त्या भावात खरेदी करावे लागते. मात्र, बळिराजाकडून भाजीपाला खरेदी करताना मात्र हेच स्वीट मार्ट चालक भाव कमी करून खरेदी करतात. परंतु, मिठाई घेताना भाव कमी करीत नाहीत. मागेल तेवढ्या किमतीतच मिठाईचे पैसे मोजावे लागतात आम्हाला.
सुरेश हटवार, सिरसी.