लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली की, पूर नियंत्रणासाठी गोसे प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडले जातात. गत महिनाभरात या प्रकल्पातून सुमारे तीन हजार ५०० दशलक्ष घनमीटर पाणी वाहून गेले. एकीकडे शासन पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्यासाठी विविध उपाययोजना करीत असताना जलसंचयाची पुरेशी व्यवस्था नसल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे.पवनी तालुक्यात गोसेखुर्द प्रकल्प आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता ११४६.०८ दलघमी आहे. तर उपयुक्त प्रकल्पीय साठा ७४०.१७ दलघमी आहे. मात्र विविध कारणांनी गत काही वर्षांपासून या प्रकल्पाचा जलस्तर अधिकाधिक २४३.९०० मीटरपर्यंत वाढविली जाते. यावर्षीही एवढाच जलस्तर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रकल्पात पाणी अतिरिक्त झाले की दरवाजे उघडून सोडल्या जाते. सध्या या प्रकल्पात उपयुक्त पाणी साठा ४३४.७५ दलघमी आहे. वैनगंगेच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होते आणि हेच अतिरिक्त होणारे पाणी सोडले जाते.पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरविण्यासाठी प्रशासन विविध मोहिमा आखत आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून घरावरील छताचे पाणी जमिनीत मुरविले जात आहे. तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी अतिरिक्त होत असल्याने नदीपात्रात सोडले जात आहे. या प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसंचय करण्यासाठी सध्यातरी कोणत्याही उपाययोजना दिसत नाही. सध्या प्रशासनाच्या वतीने दररोज दरवाजे उघडून पाणी सोडण्याचा प्रकार सुरु आहे. यामुळे लाखो लिटर पाणी दररोज नदीपात्रात वाहून जात आहे.महिनाभरात वाहून गेले तीन हजार ५०० दलघमी पाणीवैनगंगा नदीचा जलस्तर वाढल्याने ३१ जुलै रोजी सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले. त्यावेळी ५८६८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ३ आॅगस्ट रोजी २० दरवाजे अर्धा मीटरने तर १३ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले. त्यावेळी ४८७६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ४ आॅगस्ट रोजी १८ दरवाजातून १९४७ क्युमेक्स, ५ आॅगस्ट रोजी ४ गेटमधून ४३६ क्युमेक्स, ८ आॅगस्ट रोजी ३३ गेटमधून ४५३८.७४ क्युमेक्स, ९ आॅगस्ट रोजी ३३ गेटमधून ६९४५ क्युमेक्स, १० आॅगस्ट रोजी १७ गेटमधून १८४३ क्युमेक्स, ११ आॅगस्ट रोजी ३३ गेटमधून ३६०२ क्युमेक्स, १४ आॅगस्ट रोजी २९ गेटमधून ३१६५ क्युमेक्स, १६ आॅगस्ट रोजी २१ गेटमधून २३०० क्युमेक्स, २३ आॅगस्ट रोजी १३ गेटमधून १४४५.६० क्युमेक्स, २६ आॅगस्ट रोजी २१ गेटमधून २३४३ क्युमेक्स, २७ आॅगस्ट रोजी ३३ गेटमधून ३६८२ क्युमेक्स आणि २८ आॅगस्ट रोजी २७ गेटमधून ३०१२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. महिनाभरात अतिरिक्त ठरलेले सुमारे ३ हजार ५०० दशलक्ष घनमीटर पाणी प्रकल्पातून सोडून देण्यात आले. पूर नियंत्रणासाठी पाणी सोडल्याशिवाय प्रकल्प प्रशासनाला पर्याय नाही.
गोसेतून दररोज लाखो लिटर पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:51 PM
पवनी तालुक्यात गोसेखुर्द प्रकल्प आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता ११४६.०८ दलघमी आहे. तर उपयुक्त प्रकल्पीय साठा ७४०.१७ दलघमी आहे. मात्र विविध कारणांनी गत काही वर्षांपासून या प्रकल्पाचा जलस्तर अधिकाधिक २४३.९०० मीटरपर्यंत वाढविली जाते.
ठळक मुद्देजल साठविण्याचा प्रश्न : वैनगंगेची पातळी वाढली की उघडले जातात दरवाजे