शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

खस, वुडवूलच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2017 12:29 AM

उन्हाळ्याची चाहूल लागताच खस, वुडवूलची मागणीही वाढू लागते. या मागणीतून लाखोंची उलाढाल होत असल्याचे दिसून येते.

आला उन्हाळा : बेरोजगारीवर मात, सालेभाटा, धारगाव येथील विक्रेते भंडाऱ्यात भंडारा : उन्हाळ्याची चाहूल लागताच खस, वुडवूलची मागणीही वाढू लागते. या मागणीतून लाखोंची उलाढाल होत असल्याचे दिसून येते. होळीचा सण आटोपला असून उष्णतेत दिवसेंगणिक वाढ होत असल्याचे दिसून येत असून कुलरच्या ताट्या व वुडवूलच्या मागणीत वाढ होत आहे. दरवर्षीप्रमाणे लाखनी तालुक्यातील सालेभाटा, साकोली तालुक्यातील धानोड व भंडारा तालुक्यातील धारगाव येथील काही कुटूंब खस तथा वुडवूलचा व्यवसाय करण्यासाठी भंडाऱ्यात डेरे दाखल झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग तथा शहरातील मुख्य मार्गांवर खस व वुडवूल विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहे. उन्हाळा सुरू होताच नागरिकांचा कल थंड पेय तथा घरातील वातावरण थंड करण्यासाठी कुलरचा वापर करतात. सध्यस्थितीत मोठ्या प्रमाणात कुलरचे रिपेरिंगची कामे होत आहेत. यासाठी खस तथा वुडवूलची मागणीही वाढली आहे. वुडवूल २० रूपये किलो तर कुलरची ताटी प्रती सेटप्रमाणे १२० ते १५० या भावाने विक्री होत आहे. खस हा गोंदिया जिल्ह्यातील ऊडूसा येथून पेंडीच्या भावाप्रमाणे खरेदी करून आणला जातो. याशिवाय ताटीसाठी लागणारे साहित्य नागपूर येथून बोलविले जाते. हंगामी व्यवसाय असल्याने जवळपास तीन महिन्यापर्यंत या रोजगारावर आधारित कुटूंब आपला चरितार्थ चालवितात. (प्रतिनिधी)