शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

उत्तम कामगिरीसाठी मन प्रफुल्लीत असणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 10:30 PM

घरातील वातावरण आल्हाददायक, मनाला प्रफुल्लीत करणारे असेल तर कर्तव्यसुद्धा तेवढेच आनंदाने व जोमाने पार पाडू शकतो. मात्र घरचे वातावरणच जर त्रासदायक असेल तर काम करताना साहजीकच चिडचिड निर्माण होवून कर्तव्य निटपणे पार पाडू शकणार नाही. मोहाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीचा पुढील भाग फारच जिर्ण झालेला होता तिथे काम करताना त्रास व्हायचा, आता मात्र त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आल्याने तेथे बसून काम करणाऱ्या पोलिसांचेही मन प्रफुल्लीत होवून ते आपले कर्तव्य चोखपणे बजावतील, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी केले.

ठळक मुद्देविनिता साहू : मोहाडी पोलीस ठाण्याचे सौंदर्यीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : घरातील वातावरण आल्हाददायक, मनाला प्रफुल्लीत करणारे असेल तर कर्तव्यसुद्धा तेवढेच आनंदाने व जोमाने पार पाडू शकतो. मात्र घरचे वातावरणच जर त्रासदायक असेल तर काम करताना साहजीकच चिडचिड निर्माण होवून कर्तव्य निटपणे पार पाडू शकणार नाही. मोहाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीचा पुढील भाग फारच जिर्ण झालेला होता तिथे काम करताना त्रास व्हायचा, आता मात्र त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आल्याने तेथे बसून काम करणाऱ्या पोलिसांचेही मन प्रफुल्लीत होवून ते आपले कर्तव्य चोखपणे बजावतील, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी केले.मोहाडी पोलीस ठाण्याच्या समोरील पडविचे व ठाणेदार कक्षाच्या विस्तारित वास्तुच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुधाकर चव्हाण, प्रभारी ठाणेदार ढोबळे उपस्थित होते.मोहाडी पोलीस ठाण्याची दयनिय अवस्था होती. या पोलीस ठाण्याची स्थापना १९४८ ला झाली त्यामुळे ही इमारत जवळपास ७० वर्षी जुनी आहे. कौलारु छत असल्याने व लाकडी फाटे सडल्याने पावसाळ्यात पाणी गळत होते. उन्हाळ्यात उष्णलाटा आत यायच्या, ज्यामुळे अंमलदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मोहाडी येथे रूजू झाल्यावर ठाणेदार सुधाकर चव्हाण यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी लोकसहभागातून परिस्थिती सुधारण्याचा विडा उचलला. यासाठी पोलीस अधिखक विनीता साहू व एसडीपीओ संजय जोगदंड यांच्या परवानगीने तालुक्यातील सामाजिक व्यक्ती व दानशुर व्यक्ती यांची भेट घेवून समस्या मांडल्या. अजय साकुरे यांनी छताखाली टिन दिले, जलील रिझवी यांनी बांधकामाचे संपूर्ण सिमेंट व लेबर खर्च दिला. बेटाळा ग्रामपंचायतचे सरपंच रामसिंग बैस यांनी टाईल्स दिल्या, सुरेश ठवकर यांनी छतासाठी प्लायवूड दिले. सचिन गायधने यांनी संपूर्ण नवीन बांधकामाची रंगरंगोटी करून दिली. विटा व्यवसायीक सचिन राखडे यांनी विटा दिल्या. या लोकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून केलेल्या सहकार्याच्या जोरावर पोलीस ठाण्याचे सौंदर्यीकरण झाले. ज्यामुळे मोहाडी पोलीस ठाणे नववधू सारखे सुंदर झाले आहे. या कार्यक्रमात दानदात्यांचा सत्कार करण्यात आला. पोलिसांची उत्कृष्ठ भूमिका मांडणारे पत्रकार सिराज शेख, यशवंत थोटे यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला पोलीस विभागाचे राऊत, वाकलकर, वाघमोडे, चांदेवार, सेलोकर, आस्वले, केवट, पिकलमुंडे, शरणागत, हाके, शेंडे, निकोसे, तिवाडे, वरकडे, शेंडे, मेश्राम, रोडगे, भुरे, चोरमोर, भांडे, गिºहेपुंजे, कासदा, गोमासे, बडगे, बांते, ठवकर, अगाशे वालदे आदी उपस्थित होते. संचालन राहुल डोंगरे यांनी तर प्रस्तावना ठाणेदार सुधाकर चव्हाण यांनी केले. आभार पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम यांनी मानले.