लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला शासनाचे प्राधान्य असून बचत गटांना बाजारपेठ मिळावी म्हणून बचत गट निर्मित वस्तुंच्या केंद्रीय विक्रीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भंडारा येथे मिनी मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉल मधून बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल, असे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सांगितले.कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, उमेद प्रकल्प व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २६ डिसेंबर २०१८ दरम्यान दसरा मैदान शास्त्री चौक, भंडारा येथे वैनगंगा कृषि महोत्सव व सरस महिला बचत गट विक्री प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप बुधवारी झाला, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, महिला बाल कल्याण सभापती रेखा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य निळकंठ कायते, कारेमोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण यंत्रणा मनिषा कुरसंगे, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. सतिश राजु व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शेतकरी व महिला बचत गटांना नविन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी यासाठी कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, शेतकºयांनी नविन प्रयोगाची माहिती करुन घेवून हे प्रयोग आपल्या शेतीत केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होईल. या महोत्सवात विविध विभागाच्या योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते. या योजनांचा लाभ गरजुंनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.कृषि व बचत गट एकमेकाला पूरक असून कृषि महोत्सवाच्या माध्यमातून दोन्ही वगार्चे सक्षमीकरण व्हावे यासाठी ग्रामीण विकास यंत्रणा व कृषि विभागाने एकत्रित हा महोत्सव आयोजित केला होता, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी सांगितले. सेंद्रीय तांदुळाला मोठी मागणी या महोत्सवात मिळाली. पशुसंर्वधन विभागाच्या पशु प्रदर्शनीला शेतकºयांनी मोठा प्रतिसाद दिला. बचत गटाच्या उत्पादनांना नागरिकांनी पसंती नोंदविली. त्यामुळे हा महोत्सव शेती व बचत गटांना व्यावसायिक दिशा देणारा ठरला, असे रविंद्र जगताप म्हणाले. महिला सक्षमीकरणाला नवी उभारी या महोत्सवातून मिळेल अशी अपेक्षा रेखा ठाकरे यांनी व्यक्त केली.कृषि महोत्सवात विविध विभागाचे १५० स्टॉल लावण्यात आले होते. दर दिवशी अंदाजे ४ ते ५ हजार लोकांनी महोत्सवाला भेट दिली. या महोत्सवात विविध उत्पादनाची १३ लाखावर विक्री व नोंदणी झाली. विशेषत: महिला बचत गटांच्या खाद्याच्या स्टॉलला मोठया प्रमाणात पसंती मिळाली. पशुसंर्वधन विभागाच्या पशु दालनास शेतकºयांनी मोठया प्रमाणात गर्दी केली विशेषत: गवळावु गाय व कडकनाथ (कोंबडा) आकर्षणाचा विषय ठरले. सेंद्रिय तांदूळ, हळद, गूळ, शेती उपयोगी अवजारे या महोत्सवात आकर्षण होते. नेपेर गवताचे पाच हजार ठोंब शेतकºयांनी विकत घेतले.यावेळी प्रयोगशिल शेतकºयांचा सत्कार करण्यात आला. कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र साकोली, आरोग्य विभाग, शेतकरी उत्पादक कंपन्या, निविष्ठा विभाग, पशुसंवर्धन, महिला बचत गट, शेतकरी गट, फळबाग व भाजीपाला लागवड, औषधी वनस्पती लागवड, ठिबक सिंचन व सेंद्रिय शेती आदिंचा यात समावेश आहे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण व प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा मनिषा कुरसंगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदुराव चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार मंजुषा ठवकर यांनी मानले. कार्यक्रमाचे संचलन स्मिता गालफाडे व मूकुंद ठवकर यांनी केले. यावेळी शेतकरी व महिला बचत गटाचे शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
बचत गटांच्या वस्तूविक्रीसाठी मिनी मॉल उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:11 PM
बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला शासनाचे प्राधान्य असून बचत गटांना बाजारपेठ मिळावी म्हणून बचत गट निर्मित वस्तुंच्या केंद्रीय विक्रीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भंडारा येथे मिनी मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉल मधून बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल, असे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सांगितले.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : कृषि महोत्सवाचा समारोप, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार