लाखांदूर :
तहसीलच्या अन्नपुरवठा विभागांतर्गत अनधिकृत संगणक ऑपरेटरने बनावट चालानद्वारे रेशन दुकानदारांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला. हे प्रकरण दडपण्यासाठी अनधिकृत संगणक ऑपरेटरने रेशन दुकानदारांना घोटाळ्याची रक्कम परत करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. परंतु या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिला. अद्याप चौकशी सुरू न केल्याने तहसील जिल्हा पुरवठा विभागाच्या कारवाई संदर्भात तालुक्यातील जनतेत शंका व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, तालुक्यातील ९६ रेशन दुकानदारांकडुन सरकारने घोषित केलेल्या कमिशनमधून जास्तीची रक्कम कपात करून सदर कमिशन घोटाळा केल्याचा आरोप राशन दुकानदारांत केला जात होता. या घोटाळ्यामध्ये तहसीलच्या अन्नपुरवठा विभागाच्या अनधिकृत संगणक परिचालकाने दरमहा लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप देखील केला होता. मात्र, गेल्या एक-दोन दिवसात त्या अनधिकृत संगणक परिचालकाद्वारे कमिशन घोटाळ्यातील बनावट पावत्यांच्या बदल्यात रेशन दुकानदारां पैसे परत करत असल्याच्या चर्चेने हा घोटाळा झाला असल्याची शक्यता तालुक्यात सर्वत्रच वर्तविली जात आहे.
मात्र, या प्रकरणाचा छडा ‘लोकमत’ ने लावताच जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती दिली आहे.
परंतु हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर एक आठवडा लोटुन देखील अद्याप चौकशी सुरू न झाल्याने तालुक्यात नवनवीन तर्कवितर्कांना उधाण येत आहे .
यावेळी तहसीलच्या अन्नपुरवठा विभागाने हा घोटाळा दडपण्यासाठी कृती अधिक तीव्र करण्याच्या भीतीने जिल्हा प्रशासन या प्रकरणाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील तालुक्यातील नागरिकांत केला जात आहे.
बॉक्स
राशन दुकानदार करणार पोलिसांत तक्रार
बनावट पावत्याद्वारे दरमहा लाखो रुपयांच्या कमिशन घोटाळ्याचे प्रकरण उजेडात आले असूनही जिल्हा पुरवठा विभागाच्या तपास समितीने अद्याप तपास सुरू केला नाही. येत्या दोन दिवसात दोषींवर कारवाई केली? गेली नाही तर स्वत: रेशन दुकानदार फसवणुकीच्या आरोपावरून पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची देखील माहिती आहे. प्रकरण चांगलेच तापले असून यावर तालुक्यात सर्वत्रच चर्चा होत आहे.
कोट बॉक्स :
अनधिकृत संगणक परिचालकाची नियुक्ती कुणी केली?
तालुक्यात राशन दुकानदारांचा कमिशन घोटाळा एका अनधिकृत संगणक परिचालकाकडून घडवून आणल्याचे समोर आले आहे. या अनधिकृत संगणक परिचालकाची नियुक्ती कोणी केली, यांवर अधिक तपास करुन या प्रकरणातील सर्वच दोशींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य दीपक चिमणकर यांनी केली.