राहूल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मराठी शाळांचा निकाल उंचावण्यासाठी तुमसर शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून तालुक्यातील जिल्हा परिषद, खाजगी अनुदानीत व विना अनुदानीत अशा १२० मराठी शाळांमध्ये मिशन स्कॉलरशिप हा उपक्रम राबविला जाणार आहे. यातून ३०० प्रतीभावान विद्यार्थ्यांची निवड परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे.मिशन स्कॉलरशिप या उपक्रमांतर्गत तालुक्यातील पाचवी व आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रमाणात स्कॉलरशिप, नवोदय व एनएमएमएस परीक्षेला बसविणे हा आहे. त्यासाठी वर्गातील प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना परीक्षेसाठी तयार केले जाईल. पाचवीचे दीडशे व आठवीचे दीडशे असे तीनशे विद्यार्थी निवडले जाती. या निवडलेल्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या मदतीने दर रविवारी मार्गदर्शन केले जाईल. सराव परीक्षा व इतर साहित्य पुरवून तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाईल. तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत आणून तालुक्याचा निकाल उंचाविला जाणार आहे. यासाठी मुख्याध्यापकांना सुचना देण्यात आल्या आहेत. १५ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत स्कॉलरशिप परीक्षेच्या दृष्टीने भाषा, गणित व बुध्दीमत्ता चाचणी आदींचा सराव घेण्यात येईल. त्यानंतर चाचणी परीक्षेत उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. १८ आॅगस्ट रोजी चाचणी परीक्षा घेण्यात येईल. ३१ आॅगस्टपर्यंत निकाल घोषित केला जाईल.विद्यार्थ्यात अभ्यासूवृत्ती निर्माण करण्यासाठी व त्यांच्या सुप्त गुणांना उजाळा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील मुख्याध्यापकांनी यासाठी सहकार्य करावे.-विजय आदमनेगटशिक्षणाधिकारी तुमसर
मराठी शाळांत ‘मिशन स्कॉलरशिप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:34 PM
मराठी शाळांचा निकाल उंचावण्यासाठी तुमसर शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून तालुक्यातील जिल्हा परिषद, खाजगी अनुदानीत व विना अनुदानीत अशा १२० मराठी शाळांमध्ये मिशन स्कॉलरशिप हा उपक्रम राबविला जाणार आहे. यातून ३०० प्रतीभावान विद्यार्थ्यांची निवड परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
ठळक मुद्देशिक्षण विभागाचा पुढाकार : तीनशे विद्यार्थ्यांची होणार निवड