आरटीओ व पोलीस विभागाचे दुर्लक्ष : हॉटेल, बिअरबार समोर उभी राहतात वाहनेसाकोली : शहरात काही ठिकाणी खासगी वाहनावर भारत सरकार व महाराष्ट्र शासन सेवार्थ असे लिहिले असून ही वाहने शासकीय नावावर या वाहनांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र वाहनांच्या तपासणीकडे आरटीओ व पोलीस विभाग मात्र दुर्लक्ष करीत आहे.साकोली तालुक्यात नोंदणीकृत शासकीय वाहने असून विहित शासकीय विभागाद्वारे कंत्राटी पद्धतीने सुद्धा अतिरिक्त वाहने भाडेतत्वावर घेतली जातात. मात्र या वाहनांचा वापर हा शासकीय कामकाजासाठी केला जात असल्यामुळे त्या वाहनावर भारत सरकार व महाराष्ट्र शासन सेवार्थ असे अंकीत केले जाते. भाडेतत्वावरील ही वाहने आठवड्यातून पाच दिवस शासकीय कामाकाजासाठी उपयोगात आणली जात असली तरी उर्वरित दोन दिवस ही वाहने खाजगी कामासाठी वापरली जातात. वास्तविक खासगी कामासाठी वापरली जात असताना वाहनावरील शासकीय सेवार्थचे फलक काढणे आवश्यक आहे. सुटीच्या दिवशी ही वाहने शहरात अनेक ठिकाणी उभी असल्याचे निदर्शनास आले आहे. हा गंभीर प्रकार अनेक दिवसापासून शहरात सुरू आहे. शहरातील पानटपऱ्या, हॉटेल, बिअरबार, निर्जनस्थळी, व्यापारी प्रतिष्ठाने आदीसमोर ही शासकीय सेवार्थ लिहिलेली वाहने आढळून आली आहेत. शासकीय वापरासाठी भाड्याने घेतलेल्या वाहनांचा खाजगी कामासाठी वापर होत असताना गैरप्रकाराची शक्यता नाकारता येत नाही. खेदची बाब म्हणजे शासकीय सेवार्थ असे लिहिले असल्याने या वाहनांच्या तपासणीचे हिम्मत पोलीस किंवा आरटीओ विभाग कधीच करीत नाही. त्यामुळे अशा वाहनामधून गैरप्रकाराची शक्यता अधिक जास्त झाली आहे. नोटांचे व्यवहार, तस्करी, अवैध धंदे, आदिवासी वाहनांचा वापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)
साकोलीत शासकीय वाहनांचा गैरवापर
By admin | Published: March 13, 2017 12:27 AM