लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : स्थानिक युनिव्हर्सल अँड हायसिन्थ लिटील फ्लावर स्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मिनाली योगराज देशपांडे हिने लाखनी तालुक्यात प्रथम येण्याचा व जिल्ह्यातून मागासवर्गीयातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.मिताही ही युनिव्हर्सलची कुशाग्र बुद्धीमत्ता असलेली विद्यार्थिनी आहे. तिला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे. मितालीचे वडील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक आहेत व आई गृहिणी आहे. मितालीला आई वडील, मामा, मामीचे मार्गदर्शन मिळाले आहे. मितालीने गणित, विज्ञानचे ट्युशन लावले होते. तसेच शाळेतील शिक्षकांनी मार्गदर्शन केल्याने मितालीला दहावीच्या परीक्षेत ९४.४० टक्के गुण मिळाले.आपण प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊ अशी तिला आशा होती. युनिव्हर्सलचे प्राचार्य सुधीर काळे, वर्गशिक्षक निलेश राऊत, शाळेचे संचालक एम जॉन, एम.एस. शैषन यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाले. अभ्यासासोबत मितालीने शाळेच्या अनेक उपक्रमात हिरहिरीने सहभाग घेतला होता. जिद्द, मेहनत व गुरुजनांचा सल्ला यशासाठी महत्वाचे ठरले. वैद्यकीय क्षेत्रातून जनसामान्यानची सेवा करण्याचा ध्येय असल्याचे सांगितले.
मितालीला डॉक्टर बनण्याचे स्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:53 AM
स्थानिक युनिव्हर्सल अँड हायसिन्थ लिटील फ्लावर स्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मिनाली योगराज देशपांडे हिने लाखनी तालुक्यात प्रथम येण्याचा व जिल्ह्यातून मागासवर्गीयातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
ठळक मुद्देभरारी : मागासवर्गीयातून जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान