जंगलात सुखरूप सोडले : गोसेखुर्दच्या कालव्यात पडले होतेलोकमत न्यूज नेटवर्कपवनी : तालुक्यात वन्यजीवांचे संरक्षणाकरिता कार्यरत ‘मैत्र’ या वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहुउद्देशिय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गोसेखुर्द धरणाचे उजव्या कालव्यात पडलेल्या एका निलगाईला सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडून दिले.बुधवारला सकाळच्या सुमारास गोसेखुर्द धरणाचे उजव्या कालव्यात निलगाय पडून असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. हा कालवा कोरडा असला तरी निलगाईला बाहेर काढण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे वनविभागाने ‘मैत्र’च्या सदस्यांना घटनास्थळी बोलाविले. या सदस्यांनी कोणताही विलंब न करता ते घटनास्थळी पोहोचून निलगायीला नहराच्या बाहेर काढण्यासाठी सुरूवात केली. जाळीचे सहाय्याने निलगायीला पकडून मैत्रचे पदाधिकारी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नहराच्या बाहेर काढले. त्यांतर अधिकाऱ्यांसमोर जंगलात सुखरूप सोडण्यात आले. या रेस्क्यु आॅपरेशनमध्ये ‘मैत्र’चे उपाध्यक्ष महादेव शिवरकर, सचिव माधव वैद्य, महेश मठीया, संघरत्न धारगावे, अमोल वाघधरे, नामदेव मेश्राम, मयूर रेवतकर, गुलाब सिंधीया, वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक नंदेश्वर, वनरक्षक ए.एस. करपते, वनमजून आर.एम. कुर्झेकर, एच.पी. मुंडले यांनी सहकार्य केले.
‘मैत्र’ने वाचविले निलगाईचे प्राण
By admin | Published: July 06, 2017 12:32 AM