वरठी : घरात अठराविश्व दारिद्रय असताना मेहनतीचे पैसे व्यसनात उडवले. व्यसनामुळे भर तारूण्यात जर्जर आजार जडले. उपचारासाठी पैसे नसल्यामुळे वयाच्या तिसाव्या वर्षी वरठी येथील तरूण मरणाअवस्थेत आला. ही माहिती मिळताच आमदार चरण वाघमारे यांनी तरूणाचे घर गाठले. आजाराबद्दल आस्थेने चौकशी करून त्याच्या उपचाराची जबाबदारी घेतली. लवकरच तरूणाला उपचारासाठी वर्धा येथे नेण्यात येणार आहे.हनुमान वॉर्ड वरठी येथे ललीत दाभनकर नामक युवक आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांसोबत राहतो. व्यवसायाने तो वाढई काम करत होता. वडिलाची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अल्पवधीत त्याला वडिलाचा वाढई व्यवसाय सांभाळावे लागले. हातात कौशल्य असल्यामुळे त्याला पटापट काम व त्यामोबदल्यात चांगले दाम मिळू लागले. हातात पैसा येवू लागला. घरातील परिस्थिती चांगली नसल्यामुळे पैसा येताच त्याला वाईट सवयी लागल्या. मेहनतीने कमवलेला पैसा व्यसनात खर्च होवू लागला. वाईट मित्राच्या संगतीने एवढा व्यसणाच्या आहारी गेला की त्याला जर्जर आजार जडले.सुदृढ शरीर असलेल्या ललीतचे आजाराने बेहाल झाले. आजारामुळे काम बंद झाले. यामुळे आवकही बंद झाली. वयोवृध्द वडीलाने त्याला वाचवण्यासाठी सर्वाेतपरी मदत केली. पण शस्त्रक्रियेसाठी पैसा नसल्यामुळे वर्षभरापासून तो घरीच उपचार घेत आहे. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र देशमुख यांना धनराज निंबार्ते यांनी सांगितली. त्यावरून विरेंद्र देशमुख यांनी त्या युवकाच्या घरी जावून चौकशी केली. परिस्थिती अत्यंत वाईट असल्यामुळे सदर माहिती आमदार चरण वाघमारे यांना देण्यात आली. आमदार चरण वाघमारे यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्या युवकाला भेट दिली. त्याच्या प्रकृतीची माहिती घेवून त्याला तत्काळ सर्वाेतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्या युवकाच्या उपचाराकरीता लवकरच त्याला वर्धा किंवा मुंबई येथे हलविण्यात येणार आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे उपस्थित होते.हातात कौशल्य असूनही काम करता येत नाही. त्याच्या उपचारासाठी वयोवृद्ध वडिलाना झटावे लागत आहे. ही भयानक परिस्थिती टाळता येते. आमदार चरण वाघमारे यांच्या पुढकाराने ललीतचे उपचार होणार आहे. पण अशी परिस्थिती युवकांनी स्वत:वर ओढावून घेवू नये, असे आवाहन चरण वाघमारे यांनी युवकांना केले आहे. (वार्ताहर)
आजारग्रस्त युवकाच्या मदतीला आमदार सरसावले
By admin | Published: September 19, 2015 12:45 AM