वरठी ठाणे गुन्हेगारासाठी सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे. अवैद्य व्यावसायिकांना अभय मिळत असल्याने गुंडगिरी वाढली आहे. पोलिसांचे नियंत्रण फक्त देवाणघेवाण पुरते असल्याने अवैद्य धंदे फोफावले आहेत. महिला व मुलींना रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. गावठी दारू, गांजा, चरस यासारखे पदार्थ सहज मिळते. पोलिसांच्या आशीर्वादाने वरठी अवैद्य धंदे व कुख्यात गुंडांचे आश्रयस्थान झाले आहे. ठाण्याच्या हद्दीत जवळपास २०० हातभट्टी दारू विक्रेते आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली.
घराघरात देशी-विदेशी दारू खुलेआम विकली जाते. सामान्य नागरिकांना खोट्या तक्रारीत अडकवण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांच्या जाचाला कंटाळलेल्या नागरिकांनी थेट पोलीस ठाणे गाठले व समस्यांचा पाढा वाचला. यावेळी आमदार राजू कारेमोरे यांच्यासह उपसरपंच सुमित पाटील, माजी सरपंच संजय मिरासे, दिलीप गजभिये, एकनाथ फेंडर, पंचायत समितीचे माजी उपसभापती कमलेश कनोजे, नेरीचे सरपंच आनंद मलेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, अरविंद येळणे, छोटू मिरासे, सचिन कारेमोरे, योगेश हटवार, विशाल शेंडे, चेतन डांगरे, शैलेश रामटेके, सीमा डोंगरे, विजय पारधी, तारा हेडाऊ, रीता हलमार, प्रतिमा राखडे, बबलू सय्यद, पुरुषोत्तम पात्रे उपस्थित होते.
बॉक्स
महिलेला ठाण्यात रात्रभर बसवून ठेवले
येथील शास्त्री वाॅर्डातील सरिता घरडे यांच्या घरावर जुन्या भांडणातून हल्ला करण्यात आला. पती विनोद घरडे यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. भांडण सोडवायला आलेल्या इसमालाही जखमी केले. तक्रार करण्यासाठी रविवारी रात्री ११ वाजता सरिता घरडे ठाण्यात गेल्या होत्या. मात्र, पोलिसांनी तक्रार लिहून घेण्यास तब्बल ६ तास तात्कळत बसवून ठेवले. त्यांच्या सोबतीला एकही महिला कर्मचारी नव्हते. पती व शेजारी गंभीर जखमी असताना साधी विचारपूस केली नाही. हल्ला करणाऱ्याच्या तक्रारीवरून चौकशी न करता गुन्हे नोंदविले. जखमींना दवाखान्यात नेणारे चंद्रकांत झळके, सचिन झळके व भांडण सोडवायला गेलेला सूर्यकांत झळके यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवण्यात आले, असा आरोप करण्यात आला.
मध्यरात्री २ वाजता पोलीस चौकशी
भांडणात जखमीची दखल घेऊन सदर प्रकरण समजून न घेता मध्यरात्री २ वाजता पोलीस घटनास्थळावर गेले. दरम्यान खोट्या तक्रारीवरून पोलिसांनी चुकीचे घटनास्थळ तक्रारीत नोंद केली. जखमी विनोद घरडे व सूर्यकांत झळके यांच्या काळजीत असलेल्या कुटुंबीयांना समज देऊन पोलीस परतले. तक्रार कर्त्याकडून कोणतीही माहिती न घेता जखमी इसमाच्या घरातील महिलांना दमदाटी केल्याची तक्रार आमदार राजू कारेमोरे यांच्याकडे करण्यात आली.
पोलिसांवर कारवाईची मागणी
दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली. पोलिसांच्या जुलमी व्यवहाराचे अनेक दाखले देण्यात आले. पोलिसांची सापत्न वागणूक मिळत असल्याने पोलिसांवर कारवाई करून स्थानांतरण करण्यासाठी आमदार राजू कारेमोरे यांच्याकडे करण्यात आली. याबाबत पोलीस अधीक्षक, राज्याचे गृहमंत्री, पोलीस आयुक्त, मानवी हक्क आयोग व महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
कोट
पोलीस प्रशासनावर नागरिकांचा कमालीचा रोष आहे. मी अनेकदा ठाणेदार व वरिष्ठाना कळविले; पण सुधारणा झाली नाही. त्यामुळे ठाण्यात येऊन नागरिकांच्या समस्या मांडण्यात आल्या. सामान्य माणसावर अन्याय सहन केला जाणार नाही. यासाठी रस्त्यावर येऊ वरठी ठाण्याच्या जुलमी धोरणाची तक्रार गृहमंत्र्यांकडे करणार आहे.
- राजू कारेमोरे, आमदार, तुमसर
240821\img_20210824_114718.jpg~240821\img_20210824_103907.jpg
पोलीस ठाण्यात आमदार राजू कारेमोरे व इतर नागरिक~ठाणेदार यांच्याशी वार्तालाप करताना