या वेळी आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष कॉ. दिलीप उटाणे, जिल्हा अध्यक्ष सविता लुटे यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष मंगला रंगारी, सचिव सुषमा जांभूळकर, कार्याध्यक्ष प्रमिला बागडे, आशा कांबळे, ज्योती फुल्लुके, दुर्गा भोयर, करिश्मा उईके, विना लुटे, विद्या कांबळे, बिंदू रामटेके, जयश्री बुराडे, यामिनी हर्षे, पुष्पा डोंगरवार, जयमाला दिवटे, दमयंती दहिवले, मंगला चुटे यांच्यासह अन्य महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
बॉक्स
या आहेत मागण्या...
शासनाने दिलेले सर्व जुने मोबाइल परत घेऊन नवीन चांगल्या दर्जाचे मोबाइल द्यावेत, मोबाइलमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्त करून देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, पोषण ट्रॅकर ॲप्स मराठीत करावे, अशी मागणी आहे.
बॉक्स
या आहेत समस्या....
मोबाइलची वॉरंटी संपली आहे, मोबाइल सतत हँग होतात, गरम होतात, मोबाइल वेळेत दुरुस्त होत नाहीत, मोबाइलची रॅम कमी असल्यामुळे ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी जागा उपलब्ध राहत नाही. यामुळे अनेकदा कामात अडचणी येतात.
140921\img-20210914-wa0029.jpg
मोबाईल परत करतेवेळी महिला अंगणवाडी कर्मचारी