लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : परिसरात भारतीय दुर संचार निगम लिमिटेडची सेवा आहे. खासगी व्यक्तीसह शासकीय तथा निमशासकीय कार्यालयात व बँकमध्ये बीएसएनएलचे नेटवर्क (जाळे) पसरले आहे. सेवा घेण्यात ग्राहक व संस्थेमध्ये वाढ होत असली तरी नियमित सेवा देण्यास बीएसएनएल कुठेतरी मागे पडत आहे. परिणामी ग्राहकांमध्ये संबंधित विभागाविरोधात नाराजीचा सुर उमटत आहे.ग्रामीण भागात दिवसेंदिवस बीएसएनएलची सेवा डोकेदुखी ठरत आहे. परिसरात सर्वत्र बीएसएनएलची सेवा मोठ्या प्रमाणात ग्राहक व कार्यालय, बँक या ठिकाणी घेतली जात आहे. कदाचीत विजेचा पुरवठा खंडीत झाला तर पुर्णत: नेटवर्क सेवाच कोलमडली जाते. परिणामी नाईलाजास्तव बीएसएनएल ग्राहकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागतो. टूजीच्या जुनाड दुनियेत नेटवर्क गेला की तासनतास चातकासारखी वाट पाहुन सुध्दा नेटवर्क मिळत नाही.याची प्रचिती ठाणा येथील तीन बँकामध्ये अनुभवास मिळते. ठाणा येथे बीएसएनएलचे थ्रीजी टावर उभारण्याचे मंजुर झाले आहे. मात्र या विभागाला टॉवर करीता अद्याप मशिन पुरवठा करण्यासंबंधी पाठपुरावा करण्यात आलेला नाही.दुसरीकडे परसोडी ग्रामपंचायतने टावरकरिता जागेचा ठराव दिला. ही गंभीर बाब या विभागाने वरिष्ठकरवी बीएसएनएल विभागाकडे माहिती पुरविली आहे. ही गंभीर बाब असतानादेखील संबंधित दुरसंचार विभाग ग्राहाकंच्या तक्रारीकडे मुद्दाम डोळेझाक करीत असल्याचा आरोप परिसरातील त्रस्त ग्राहक करीत आहे. खासगी कंपन्यांचा ज्याप्रमाणे परिसरात नेटवर्क आहे. त्या प्रमाणात बीएसएनएलचे नेटवर्क कार्यरत राहत नाही. संबंधित कार्यालयाकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरात बिएसएनएलची सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
मोबाईलसेवा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 9:35 PM
परिसरात भारतीय दुर संचार निगम लिमिटेडची सेवा आहे. खासगी व्यक्तीसह शासकीय तथा निमशासकीय कार्यालयात व बँकमध्ये बीएसएनएलचे नेटवर्क (जाळे) पसरले आहे.
ठळक मुद्देग्राहकांची डोकेदुखी वाढली