लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : दोनशे रुपयांची नकली नोट आढळल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच पुन्हा भंडारा तालुक्यातील जवाहरनगरमध्ये ५०० रुपयांची नकली नोट आढळून आली. एका अज्ञात ग्राहकाने किराणा दुकानदाराला दिलेल्या पैशात ही नोट आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.जवाहरनगर (ठाणा) येथील हनुमान वॉर्डातील एका किराणा दुकानात ग्राहक आला. त्याने ५०० रुपयाची नोट देऊन साहित्य खरेदी केले. काही वेळानंतर ही नोट नकली असल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले. ५०० रुपयाच्या नोटेपेक्षा या नकली नोटेचा आकार २ एमएम ने लहान आहे. तसेच हिरव्या उभ्या पट्टीत आरबीआय असे लिहिलेले नाही. वॉटर मार्कमध्ये गांधीजींचा फोटो आणि ५०० रुपये लिहिलेले दिसत नाही. तुर्तास या प्रकाराचीही तक्रार कुठे करण्यात आली नव्हती. मंगळवारी गृहकराच्या रकमेचा भरणा केल्यानंतर बँकेत २०० रुपयाची नोट नकली असल्याचे उघडकीस आले होते. आता ५०० रुपयांची नोट नकली आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत नकली नोटा चलनात तर आणल्या जात नाही ना असा संशय व्यक्त होत आहे.
ठाणात पुन्हा नकली नोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:09 PM
दोनशे रुपयांची नकली नोट आढळल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच पुन्हा भंडारा तालुक्यातील जवाहरनगरमध्ये ५०० रुपयांची नकली नोट आढळून आली. एका अज्ञात ग्राहकाने किराणा दुकानदाराला दिलेल्या पैशात ही नोट आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्दे५०० ची नोट : वॉटर मार्कमध्ये गांधीजींंचा फोटोच नाही