शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

मोहाडीत हलबा समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 11:54 PM

हलबा समाजातील व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यात यावे, समाजावर होणारा अन्याय दूर करण्यात यावा, नोकरीवर असणाऱ्या हलबा कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढू नका या मागण्यासाठी हलबा, हलबी समाजाच्यावतीने मंगळवारला मोहाडी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

आॅनलाईन लोकमतमोहाडी : हलबा समाजातील व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यात यावे, समाजावर होणारा अन्याय दूर करण्यात यावा, नोकरीवर असणाऱ्या हलबा कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढू नका या मागण्यासाठी हलबा, हलबी समाजाच्यावतीने मंगळवारला मोहाडी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भंडारा, तुमसर, सिहोरा, पवनी, मुंढरी आदी ठिकाणाहून समाजबांधव सहभागी झाले होते.मोहाडी, आंधळगाव व मुंढरी येथे हलबा समाज मोठ्या प्रमाणावर असून त्यांचा मुख्य व्यवसाय साडी, धोतर विनण्याचा आहे. त्यामुळे त्यांना कोष्टी या शब्दाने संबोधण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षापुर्वीच्या शासकीय दस्तऐवजात त्यांच्या नावासमोर कोष्टी हा शब्द लिहिला असल्यामुळे त्यांच्या जातीवर गदा आली. त्यामुळे आज त्यांना हलबा, हलबी यांना त्यांच्या जातीसाठी संघर्ष करावा लागत आहे. ज्या हलबा, हलबी बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या कुटुंबातील रक्त संबंधातील सदस्यास जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात यावे, रक्त संबंधातील घेतलेला निर्णय आदिवासी विकास विभागाला लागू करण्यात यावा, रक्ताच्या नात्यातील सदस्यांना वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत आदिवासी विकास विभागाने शासन निर्णय काढावा, सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्र सरकारने विशेषाधिकाराचा वापर करून कोणत्याही हलबा, हलबी समाजातील कर्मचारी, विद्यार्थीवर कारवाई करू नये, संविधानाच्या अनुच्छेद १६१ मध्ये राज्यपालांना अधिकार दिले आहे. त्यानुसार हलबा, हलबी जमातीच्या कर्मचाºयांना नोकरीत या अनुच्छेदानुसार अध्यादेश काढण्याची राज्यपालांना शिफारस करण्यात यावी. संविधानाच्या अनुच्छेद १६ (२) नुसार सेवेत सामावून घेण्यात यावे, अनुसूचित जमाती पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेले हलबा, हलबी जमात पडताळणी प्रकरणे शासन निर्णय घेईपर्यंत निकाली काढू नये आदी मागण्यांचे निवेदन तहसलिदार मोहाडी यांना देण्यात आले.तत्पुर्वी हलबा बांधवांचा मोर्चा नवप्रेरणा विनकर भवन येथून निघून मोहाडी शहरात भ्रमण करीत तहसिल कार्यालयावर पोहचल्यावर आमदार चरण वाघमारे, सभापती हरीश्चंद्र बंधाटे, प्रकाश निमजे, अ‍ॅड. नंदा पराते, उदय धकाते, डॉ.अनिल धकाते, आशिष पातरे यांनी मोर्चेकºयांना मार्गदर्शन केले.यावेळी नगराध्यक्ष स्वाती निमजे, नगरसेवक शोभा बुरडे, वामन बोकडे, महेश निमजे, यादोराव कुंभारे, रामदास पराते, राजु बावणे, नरेंद्र बारापात्रे, महेंद्र धकाते, मोहन निमजे, रविंद्र निमजे, हेमंत डेकाटे, मंजुषा पातरे, निरंजना गोखले, रेखा निमजे, गिता डेकाटे, जगदीश निपाने आदींसह समाजबांधव मोर्चात सहभागी होते.