शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"भाजपने डॉग स्कॉड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
8
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
9
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
10
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
11
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
12
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
13
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
14
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
15
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
16
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
17
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
18
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
19
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
20
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

मोहाडी पंचायत समितीत पदाधिकाऱ्याची आदळआपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:49 AM

सत्तेचा माज चढला की, मानवी विकृती आपोआप तयार होते. मनावर ताबा नसतो. अगदी असाच प्रकार मोहाडी पंचायत समितीमध्ये अनेकांनी अनुभवला. एका पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्यांच्या दारावर लाथा मारून संताप व्यक्त केला. सगळ्या मर्यादा सोडलेल्या त्या पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्यांच्या नावाने अतिशय घाणेरड्या शिव्यांची लाखोळी वाहली.

ठळक मुद्देअसभ्य वर्तणुकीतून व्यक्त केला संताप । गटविकास अधिकाऱ्याच्या कक्षाबाहेर प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सत्तेचा माज चढला की, मानवी विकृती आपोआप तयार होते. मनावर ताबा नसतो. अगदी असाच प्रकार मोहाडी पंचायत समितीमध्ये अनेकांनी अनुभवला. एका पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्यांच्या दारावर लाथा मारून संताप व्यक्त केला. सगळ्या मर्यादा सोडलेल्या त्या पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्यांच्या नावाने अतिशय घाणेरड्या शिव्यांची लाखोळी वाहली.या प्रकाराने पंंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची हकीकत सांगितली. तीन प्रमुख अधिकारी पंचायत समितीमध्ये अनुपस्थित होते. हे अधिकारी कुठे गेले याची शहानिशा न करता त्या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात संताप शिरला. मग काय गटविकास अधिकाºयांच्या दारावर लात मारत अधिकाऱ्यांचे नाव घेत शिवीगाळ केली. संतापाचा पारा खाली येईपर्यंत पंचायत समितीत आदळआपट सुरु होती. हा सगळा प्रकार काही कर्मचारी निमुटपणे बघत होती. त्या पदाधिकाऱ्यांच्या संतापाचे कारण, काही कंत्राट कामाचे होते, असे सांगितले जाते. मनावरील तोल सोडून दारावर राग काढणे, पंचायत समितीत गोंधळ घालणे, शिव्या देणे असा प्रकार पदाची गरीमा खालच्या पातळीवर आणणारा होता. एका ग्रामसेवकाचा रोष तसेच एका विभागात नियमबाह्य काम करणारा व्यक्तीचे होते. पण अधिकारी कार्यालयात नसताना मोहाडी पंचायत समिती मधील कारभार प्रभारावर सुरु आहे. अधिकारी स्वमर्जीने कारभार करू शकत नाही, असे बोलले जाते. या प्रकरणावर कर्मचाऱ्यांची बैठक झाल्याचे समजते.एका विभागात एक अधिकारी अनेक दिवसांपासून पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. त्या अधिकाºयांची बदली करावी अशी मागणी व तक्रार त्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी कर्मचाऱ्यांची बैठक झाली. त्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करायचा असे ठरले. पण काहींनी वाद नको म्हणून ही फिर्याद एका नेत्यांकडे नेली. त्या नेत्यांनी पुढे असा प्रकार करायचा नाही असे बजावले. हा वाद नेत्यांच्या बैठकीत संपविण्यात आला. असा प्रकार त्या पदाधिकाºयांनी केले तर पुढील पाऊल उचलण्यासाठी आम्ही मोकळे राहू असेही सांगून टाकले. झालेल्या प्रकाराबाबत असंतोष खदखदत आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती