तालुक्यातील मोहरणा येथील सेवा सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण करण्यात आले. या लेखापरीक्षणात संस्थेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या आवार भिंतीच्या खर्चाची रक्कम अदा करण्यात आली असताना या बांधकामाचे अंदाजपत्रक गहाळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संस्थेअंतर्गत सचिवाला सात हजार रुपयाचे मानधन ठरविले होते. संबंधित मानधनात परस्पर वाढ करून अध्यक्षाच्या स्वाक्षरीविना प्रति महिना १० हजार रुपये मानधन ऊचल केल्याचा आरोप आहे. मानधनातील वाढ ही बेकायदेशीर व नियमबाह्य असून जिल्हा उपनिबंधकाच्या निर्देशाचे उल्लंघन असल्याचा ठपका लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, संस्थेच्या ठरावानुसार कर्जदार शेतकऱ्यांकडून इमारत फंडासाठी आवश्यक निधी जमा करीत असताना संस्थेतील पदाधिकारी व सचिवाने बेकायदेशीररित्या या फंडाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. २०१८-१९ मध्ये इमारत फंडाअंतर्गत जमा रकमेचा अपहार झाल्याचा आरोप देखील लेखापरीक्षण अहवालात करण्यात आला आहे.
लाखांदूरचे सहाय्यक निबंधकांकडे फौजदारी कार्यवाहीची मागणी मुरली बगमारे, नरेश राऊत, श्रीधर राऊत, लोकमान राऊत, भीमराव तांडे, मुरारी पिलारे, सरपंच प्रभाकर मेंढे, विठोबा राऊत, विलास गायकवाड, गोविंदा कुत्तरमारे, खुशाल पिलारे, जयपाल कुत्तरमारे, सुधाकर रासेकर, गौराबाई बगमारे, राकेश राऊत, संदीप राऊत, सुरेखा राऊत, ताराचंद राऊत, प्रल्हाद वकेकार, गजानन तुपटे, निशा बगमारे, विठोबा वकेकार, घनश्याम राऊत, यशवंत बगमारे यांनी केली आहे.
कोट
लेखापरीक्षण अहवालात मोहरणा येथील सेवा सहकारी संस्थे अंतर्गत गैरप्रकार झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी दिली आहे. त्यात फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. चौकशी करून आवश्यक कार्यवाही केली जाईल.
- सुरदुसे
सहाय्यक निबंधक, लाखांदूर