शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

मोहाडीत तीन घरे आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 1:09 AM

येथील सुभाष वॉर्डात तीन घरांना लागलेल्या आगीत जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारला दुपारच्या सुमारास घडली. आगीत तीन घरांपैकी दोन घरे पूर्णपणे जळालेली आहे तर एका घरातील एक भाग जळालेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाड़ी : येथील सुभाष वॉर्डात तीन घरांना लागलेल्या आगीत जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारला दुपारच्या सुमारास घडली. आगीत तीन घरांपैकी दोन घरे पूर्णपणे जळालेली आहे तर एका घरातील एक भाग जळालेला आहे.सुभाष वॉर्डातील शेवटच्या टोकावर असलेले देवराम शेंडे, सुखदेव शेंडे व रामप्रसाद शेंडे यांच्या घराला लागून असलेल्या शेतीच्या धुऱ्यावरील गवत जाळण्यासाठी कोणीतरी आग लावली.हवेमुळे ती आग या घराला लागली, असा अंदाज आहे, परिसरातील आकाश पिकलमुंडे, बादल सोनवाने, जितु सोनवाने, गुरुदेव बांते यांनी घराला लागलेली आग आटोक्यात आणण्याचे विशेष प्रयत्न केले.तसेच चेतन गोपीचंद शेंडे या युवकाने जिवाची पर्वा न करता घरात असलेले गॅस सिलेंडर बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून नष्ट झाले, आग लागल्याची सूचना प्राप्त होताच ठाणेदार शिवाजी कदम पोलीस कर्मचारी विनोद सेलोकर, पवन राऊत, मिथुन चांदेवार, आशीष तिवारी, ज्ञानेश्वर हाके, संजय बडवाईक, संजय वाकलकर, राजेश गजभिये यांनी घटनास्थळावर धाव घेवून मदत कार्यात सहभाग घेतला, तुमसर नगर परिषदेची अग्निशमन बंब येत पर्यंत वॉर्डातील युवकांनी आग आटोक्यात आणली होती.यात आशिष पात्रे यांच्या पाण्याच्या टँकरने वेळीच घटनास्थळावर पोहोचून फार मोठी कामगिरी बजावली. या घटनेत देवांगणा सुखदेव शेंडे यांनी पेटीत ठेवलेले चार हजार रुपये तसेच मंगळसूत्र व दोन नथ वितळून नष्ट झाल्या तर कविता देवराम शेंडे यांनी पेटीत ठेवलेले आठ हजार रुपये नगदी व त्यांच्या सासूचे आठ हजार रुपये जळून नष्ट झाले, याशिवाय घरातील संपूर्ण साहित्य ची राखरांगोळी झाली.घरातील अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तु, कपडे, इतर साहित्य जळून खाक झाले असल्याने त्यांच्यावर मोठेच संकट कोसळलेले आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आहे.

टॅग्स :fireआग