शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

मोहाडीत शिवसेनेचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:28 PM

शेतकºयांना आॅनलाईनच्या तावडीतून सुटका करून त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा,

ठळक मुद्देतहसीलदारांना घेराव: जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शेतकºयांना आॅनलाईनच्या तावडीतून सुटका करून त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात मोहाडी तहसील कार्यालयावर जिल्हास्तरीय धडक मोर्चा नेण्यात आला. यात तहसीलदारांना घेराव घालून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मोहाडी व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. मोर्चा मोहाडी तहसील कार्यालयावर पोहचताच तहसीलदार सुर्यकांत पाटील घेराव करून शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी अनेक मुद्द्यावर गंभीर आक्रमक चर्चा केली. शासनाने एकूण किती कर्जमुक्तीचे केंद्र मंजूर केले आहेत. यापैकी प्रत्यक्षात किती केंद्र सध्या सुरु आहेत. आजपर्यंत किती शेतकºयांचे आॅनलाईन फॉर्म भरण्यात आले, किती वेळ आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे, असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. अधिकारी एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. अधिकाºयांना मोर्चाच्या माध्यमाने प्रत्येक शेतकºयांचे शेतीचे वेगवेगळे पंचनामे घेण्याचा आग्रह केला. अनेक शेतकºयांनी पाण्याअभावी रोवणी केलीच नाही. जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाचे कालवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. ते त्वरीत दुरुस्त करून देण्यात यावे. यावर्षी पाऊस कमी बरसल्यामुळे भीषण दुष्काळ पडण्याचे १०० टक्के चित्र जिल्ह्यात निर्माण झाले असल्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.अनेक लाभार्थ्यांना मदत मिळालेली नाही, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बांधकाम झालेल्या शौचालयाचे पैसे मिळाले नाहीत ते सर्व लाभार्थ्यांना त्वरित देण्यात यावे, संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजनेंतर्गत येणाº्या लाभाथ्याना सहा-सहा महिने मानधन मिळत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. आमदार, खासदार, यांचे सुद्धा वेतन सहा-सहा महिन्यांनी देण्यात यावे. अशाप्रकारे होत असलेल्या सर्वसामान्य माणसावर अन्याय शिवसेना खपवून घेणार नाही. असा खणखणीत इशारा मोर्च्याच्या माध्यमातून देण्यात आला. या मोच्यार्चे नेतृत्व शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले व जिल्हा सह संपर्क प्रमुख दिपक शेंद्रे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी पंचायत समिती उपसभापती शेखर कोतपल्लीवार, माजी जिल्हा प्रमुख राधेश्याम गाढवे, उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, रामसिंग बैस, राजेश बुराडे, संदीप वाकडे, जिल्हा सचिव ओमेश्वर वासनिक, तालुका प्रमुख पवन चव्हाण, नरेश उचीबघले, भरत वंजारी, किशोर चन्ने, अरविंद बनकर, राजेंद्र ब्राम्हणकर, शहर प्रमुख सुर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, नरेश बावनकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित मेश्राम, महेश पटले, दिनेश पांडे, मुकेश थोटे, मनोज चौबे, राजेंद्र भांडारकर, प्रमोद गायधने, मोहीन रहमान शेख, मनोहर जांगळे, प्रकाश लसुन्ते, जगदीश त्रिभूवनकर, विवेक भोन्डेकर,नरेश टेंभरे, जयदेव चौधरी, विनोद राहांगडाले, अश्विन जगणे, अंकुश पटले, रमेशचंद्र रामटेके, अशोक कडव, विजय अटराहे, विनोद शामकुवर, योगराज टेंभरे, योगेश सोनकुसरे, श्याम बिसने, प्रकाश चौधरी, शुभम ठाकरे, सचिन राहांगडाले, नागेश शरणागते, जीवन डोये, कुंजीलाल पटले, गोवर्धन मारवाडे सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.