मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राज्यांतर्गत विनापरवाना मोहफुलाला वाहतूक व विक्रीस बंदी आहे, परंतु गत काही महिन्यापासून मध्यप्रदेशातून मोहफुलांची तुमसर तालुक्यात नियमित चोरटी वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील माडगी (दे.) परिसरात दररोज मोहफुलाची खेप ट्रकने येत आहे. संबंधित व्यावसायीक स्वत:च्या वाहनाने मोहफूल गाळप केंद्रापर्यंत पोहचते करते. या संपूर्ण प्रकरणाला पोलिसांचे पाठबळ असल्याचे स्पष्ट होते.मध्यप्रदेशातील बालाघाट, वाराशिवनी, कटंगी परिसरात मोहफुलाचे प्रचंड उत्पादन होते. महाराष्ट्राच्या सिमा मध्यप्रदेशाला लागून आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जंगलात मोहफुलाचे उत्पादन नगन्य आहे. दारू गाळप केंद्राला मध्यप्रदेशातील मोहफूल पुरविणे सर्रास सुरू आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोहफुल दारू गाळप केंद्र सुरू आहे.राज्य शासनाने स्थानिकस्तरावर मोहफूल विक्री केंद्रांना मंजुरी दिली आहे. परंतु त्याचा उपयोग मोहफूल गाळपाकरिता होत नाही. केंद्राकडून मोहफूल खरेदी केले तर महाग पडत आहे. त्यामुहे मोहफुल तस्करांनी मध्यप्रदेशातून आयात करण्याची तशी शक्कल लढविली आहे. लाखोंचा हा व्यवसाय बिनबोभाडपणे राजरोस सुरू आहे. विदेशी दारू दुकाने व बार बंद असलेल्या काळात हातभट्टीचा दारूचा व्यवसाय फोफावतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहफुलाची गरज असते. त्यातूनच मध्यप्रदेशात मोहफुल आणले जाते. या तस्करांचे नेटवर्क, नागपूर, भंडारा, गोंदिया तथा चंद्रपूर जिल्ह्यात पसरले आहे. तुमसर तालुक्यातील गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी (दे.) परिसरात दररोज अथवा एक दिवसाआड मध्यप्रदेशातून मोहफुलाचे ट्रक येत असल्याची माहिती आहे. वाराशिवनी मार्गाने कवलेवाडा, तिरोडा मार्गाने मोहफुलाचा ट्रक प्रवेश करीत असल्याचे सांगितले जाते.केंद्रावर ट्रक आल्यानंतर तेथून मोहफुल इतर ठिकाणी लहान वाहनाने गाळप केंद्रापर्यंत पोहचते केले जाते. इतर लहान गाळपकेंद्रधारक स्वत: मोहफुल नेत आहेत. सदर व्यवसाय अनधिकृत असला तरी त्यातून मोठी कपाई केली जात आहे. रस्त्याच्या शेजारी हा प्रकार रात्रीच्यावेळी सुरू असतो. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यंत्रणेला माहिती नसावी, हे न उलगडणारे कोडे आहे. हे मोठे रॅकेट असून याचा संबंध अर्थकारणाशी निश्चित आहे.मोहफुलाच्या दारूला प्रचंड मागणीदेशी-विदेशी दारूच्या किंमतीत वाढ झाल्याने ग्रामीण भागात मोहफुलाच्या दारूला मोठी मागणी आहे. नदी-नाल्याच्या तिरावर दारू गाळण्याचा व्यवसाय सध्या तुमसर तालुक्यात फोफावला आहे. अनेक जण दारूच्या आहारी गेलेले असून त्यातून अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत.
मोहफुलाची चोरटी आयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:33 AM
राज्यांतर्गत विनापरवाना मोहफुलाला वाहतूक व विक्रीस बंदी आहे, परंतु गत काही महिन्यापासून मध्यप्रदेशातून मोहफुलांची तुमसर तालुक्यात नियमित चोरटी वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील माडगी (दे.) परिसरात दररोज मोहफुलाची खेप ट्रकने येत आहे. संबंधित व्यावसायीक स्वत:च्या वाहनाने मोहफूल गाळप केंद्रापर्यंत पोहचते करते.
ठळक मुद्देबंदीचा फज्जा : मध्यप्रदेशातून ट्रकने येतात तुमसर तालुक्यात