बॉक्स
प्रवाशांना बस कुठे हे आधीच कळणार...
भंडारा विभागात सध्या आगारातील संगणकावर सर्व बसेसची स्थिती दिसून येते. तसेच प्रवाशांसाठी आगारात ठिकठिकाणी असे स्क्रीन लावण्यात आले असून त्यावर प्रवाशांना गाड्यांची स्थिती बघता येते. आता मात्र रेल्वे नुसार महामंडळ प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर बसेसचे लोकेशन बघण्याची सुविधा पुरविणार आहे. यात बस कोठे आहे, यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
बॉक्स
१५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून बस ट्रॅकिंग सिस्टमचे ॲप लाॅचिंग केले जाणार होते. मात्र यात काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे १५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला आहे. मात्र लवकरच हे ॲप लाँच होणार असून त्यानंतर प्रवाशांना बसची ताटकळत वाट पाहावी लागणार नाही.
आकडेवारी
किती बसेसला बसविली यंत्रणा?
भंडारा ७२
पवनी २९
साकोली ८८
तुमसर ६७
तिरोडा ४३
गोंदिया ८४