लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २३०० शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले आहेत. माहिती संकलनाचे काम युद्धस्तरावर सुरु असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी विजय भाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी त्यांची आॅनलाईन माहिती संकलीत करण्यात आली आहे. त्यासाठी एनआयसी आणि सातबारा संगणकीकृत करताना उपलब्ध झालेला डाटा यासाठी महत्वाचा ठरत असल्याचे विजय भाकरे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या मार्गदर्शनात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काम वेगात सुरु असल्याचे भाकरे यांनी सांगितले.जिल्ह्यात २ लाख ५३ हजार खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी दोन हेक्टर व त्या खालील शेतकरी संख्या २ लाख ३१ हजार आहे. या सर्वांची माहिती संकलीत करून छाननी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६ हजार शेतकऱ्यांचा डाटा तयार करण्यात आला असून तो शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील ६ हजार १७७ शेतकऱ्यांचा पात्र यादीत समावेश असून आतापर्यंत २३०० शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे जिल्ह्यात या योजनेबाबात कुणाचीही तक्रार नसून बँकेतून कुणाचेही पैसे परत गेले नाहीत. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधितांना योग्य सूचना दिल्या आहेत. कृषी विभाग, पंचायत विभाग, सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रशासन शर्थीचे प्रयत्न करून पात्र शेतकऱ्यांना या निधीचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सांगितले.त्रुट्या दूर करण्याचे प्रयत्नप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत संकलीत झालेल्या माहितीमध्ये काही प्रमाणात त्रुट्या असल्याचे आढळून आले. त्या त्रुट्या दूर करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर केले जात आहेत. शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन विजय भाकरे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील २३०० शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:07 PM
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २३०० शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले आहेत. माहिती संकलनाचे काम युद्धस्तरावर सुरु असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी विजय भाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ठळक मुद्देशेतकरी सन्मान योजना : जिल्हा नोडल अधिकारी विजय भाकरे यांची माहिती