वरठी : आॅनलाईन खात्यातून पैसे उडवणाऱ्या टोळीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. महिनाभरात तालुक्याच्या विविध भागातून या चोरानी अनेक खात्यातून दोन लाखाच्यावर पैसे उडवले. बँकेच्या तिजोरीतून सरळ हातात पैसे येण्याच्या नादात निनावी फोनद्वारा हवी असलेली माहिती चोरांना देण्यात येते. ग्राहकांचा हलगर्जीपणा आणि बँकेचे कर्मचारी या सर्वाच्यामुळे चोराचे अच्छे दिन सुरू आहेत. यात सुशिक्षित युवकांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे.प्रत्येक हातात मोबाईल आणि जगातील संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणारे सध्याचे युग आहे. याचा नेमका फायदा घेण्यासाठी व बँकेत येणारी ग्राहकांची गर्दी कमी करून ग्राहकांच्या सोयीनुसार व्यवहार करण्यासाठी सर्व खाजगी व राष्ट्रीय ग्राहकांना एटीएम कार्ड व आॅनलाईन आर्थिक व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून दिली. यासर्व सुविधामुळे कर्मचाऱ्याचा मनस्ताप व ग्राहकांचा वेळ वाचतो. पण सध्या या सुविधा असुविधाजनक ठरत आहेत. नकळत गुपीत असलेली माहिती चोरांना सांगण्यात होणारा ग्राहकांचा हलगर्जीपणा त्यांना नुकसान दायक ठरत आहेत. महिणाभरात तालुक्यातील वरठी, बिड, नेरी, बेटाळा आदी गावातील काही ग्राहकांच्या खात्यातून आॅनलाईन पैसे या चोरानी उडवले. वरठी येथील अक्षय कांबळे यांच्या वडिलाचे कॅनरा बँकेत खाते आहे. काही दिवसापुर्वी अक्षयच्या मोबाईलवर फोन आला. आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएमबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या खात्यातून १० हजार उडवण्यात आले. (वार्ताहर)
आॅनलाईन खात्यातून पैसे उडवणारी टोळी
By admin | Published: July 31, 2015 1:06 AM