शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

लघु उद्योगासाठी मुद्रा योजना फायदेशीर

By admin | Published: June 03, 2017 12:20 AM

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून सहज व कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याने ही योजना स्वत:चा लघु उद्योग व व्यवसाय उभारण्यासाठी फायदशीर ठरत आहे.

हरिश्चंद्र बंधाटे : मोहाडी येथे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून सहज व कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याने ही योजना स्वत:चा लघु उद्योग व व्यवसाय उभारण्यासाठी फायदशीर ठरत आहे. गरजू, होतकरू व बेरोजगार युवक युवती तसेच बचत गटानी या योजनेचा लाभ घेऊन आपला उद्योग व् यवसाय सुरु करावा, असे आवाहन पंचायत समिती मोहाडीचे सभापती हरिश्चंद्र बंधाटे यांनी केले. जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालय व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोहाडी पंचायत समितीच्या सभागृहात मुद्रा योजना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी प्रकाश हिवाळे, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक एन.वाय. सोनकुसरे, रेशिम बोर्डाचे सहाय्यक संचालक पी.जे. कोलारकर, मंडळ कृषी अधिकारी राहुल गायकवाड, बँक आॅफ इंडियाचे मुखर्जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभापती हरिश्चंद्र बंधाटे यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कर्जाद्वारे लघु व्यवसाय करणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, असे हरिश्चंद्र बंधाटे म्हणाले. आयटीआय प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच बचत गटांना ही योजना फायदेशिर ठरणार आहे. शासनाने महिला सक्षमीकरण करण्यासाठी पाऊल उचलले असून या योजनेअंतर्गत महिलांनी आपला उद्योग वाढवावा व इतरांनाही उद्योगशिल करावे, असे त्यांनी सांगितले. बचत गटांनी पारंपारिक व्यवसायासोबतच वेगळा उद्योग व्यवसाय करण्याची तयारी ठेवावी. यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध होईल. कर्ज घेणे सोपे आहे. मात्र कर्जाची परतफेड थोडे कठीण असले तरी कर्ज परतफेडीची सवय आवश्यक असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांनी सांगितले. आपला व्यवसाय निवडण्याअगोदर बाजारपेठेची गरज काय? कच्चा माल कुठे मिळेल. बाजारपेठ कुठली आदी बाबींचा सर्वे करून व्यवसाय निवडल्यास यश निश्चित हमखास मिळेल, असे त्यांनी सांगितले. व्यवसाय व उद्योगाव्यतिरिक्त कृषी पुरक व्यवसाय हे महत्वाचे क्षेत्र असून यासाठी सुद्धा मुद्रा योजनेतून कर्ज देण्यात येत असल्याचे मंडळ कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांनी सांगितले. बचत गटांना कृषी पुरक यंत्र सामुग्रीसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सविस्तर माहिती व कर्ज घेण्याची पद्धती याबाबतची माहिती स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक एन.वाय. सोनकुसरे यांनी उपस्थितांना सांगितली. कर्ज कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेतून उपलब्ध होईल. यासाठी जवळच्या शाखेत अर्ज करावा अथवा आॅनलाईन अर्ज करण्याची व्यवस्थासुद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.मोहाडी तालुक्यात २७० बचत गट असून ३५०० सदस्य आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय केले जात असून बचत गटांना व्यवसायासाठी अल्पदरात कर्ज पुरवठाकेलाजातो. अशी माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रकाश हिवाळे यांनी दिली. महिला बचत गटांनी यासोबतच मुद्रा योजनेतून कर्ज घेवून आपला व्यवसाय विस्तारित करावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात बचत गटात चांगले कार्य करणाऱ्या सदस्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मोहडी तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक वनमाला बावनकुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यावेळी तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत वर्षभर असलेल्या कार्यक्रमाचा अहवाल ठेवण्यात आला. यावेळी केंद्राच्या अध्यक्षा उर्मिला लांजेवार यांचेसह सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमास बचत गटांच्या सदस्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी व विविध बँकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.