शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

धनादेश क्लिअरन्ससाठी लागतो महिना

By admin | Published: January 21, 2017 12:33 AM

स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा मोहाडीच्या कर्मचाऱ्यांच्या अरेरावीने खातेधारक त्रस्त आहेत.

मोहाडीत बँक खातेदारांमध्ये संताप : शेतकऱ्यांसमोर पेच, कॅशलेशला हरताळमोहाडी : स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा मोहाडीच्या कर्मचाऱ्यांच्या अरेरावीने खातेधारक त्रस्त आहेत. या बँकेत जमा करण्यात आलेल्या धनादेशाला क्लिअरन्ससाठी एक महिन्याचा अवधी लागतो. धनादेश क्लिअर होत नसल्याने धानाचे चुकारे असलेले धनादेश प्राप्त होऊनही शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेश व्यवहाराला बँकेतर्फे हरताळ फासल्या जात असल्याचा आरोप आता खातेदारांकडून होत आहे.मोहगाव देवी येथील शेतकरी चंद्रशेखर साखरवाडे यांनी धान विकला. त्यांना ६ हजार ८०० रूपयांचा धनादेश व्यापाऱ्याकडून प्राप्त झाला. त्यांचे खाते स्टेट बँक मोहाडी येथे असल्याने त्यांनी तो धनादेश क्रमांक ०१५१८४ स्टेट बँक मोहाडी येथे २७ डिसेंबर २०१७ रोजी जमा केला. खात्यावर रूपये जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी ते तीन चार वेळा बँकेत गेले. मात्र त्यांची रक्कम आजपर्यंत जमा झालेली नाही. याबाबत त्यांनी बँकेच्या व्यवस्थापक श्वेता साळवे यांना विचारणा केली असता त्यांनी धनादेश काऊंटर लिपीक निता घोडपाणे यांना भेटायला सांगितले. मात्र, धनादेशाच्या रक्कमेची माहिती दिली नाही. धनादेश लिपीकांनी तर त्यांना सरळ २५ दिवसानंतरच यावे तोपर्यंत बँकेतून येवू नये असे धमकावून सांगितले. धनादेश जमा करून आज २५ दिवस लोटले असले तरी धनादेशाची रक्कम जमा झालेली नाही. बँक कर्मचारी अरेरावीने व चढ्या आवाजात असमाधानकारक उत्तरे देतात ज्यामुळे ग्राहकांचा तिडपापड होत आहे. ग्राहकांना या वर्तनुकीमुळे शारीरिक व आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. साखरवाडे यांनी जिल्हाधिकारी, आमदार चरण वाघमारे, तहसीलदार मोहाडी, ठाणेदार मोहाडी यांचेकडे तक्रार केली आहे. कॅशलेश व्यवहार करून आपल्याच पायावर धोंडा मारून घ्यावा असा प्रश्न केला असून बँकेच्या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी) धनादेशाचे नागपूर कार्यालयातून क्लिअरन्स होतात. आमच्या शाखेतून होत नाही. सध्या धनादेशांची संख्या वाढलेली असल्याने थोडा उशीर होत आहे. काही दिवसातच ही समस्या सुटेल.-श्वेता साळवे, व्यवस्थापक, स्टेट बँक आॅफ इंडिया, मोहाडी.