लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम मुरूम व रेतीअभावी रखडल्याची माहिती पुढे आली आहे. दुपदरीकरणाचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा असून एकेरी मार्गाचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. मोहाडी तथा तुमसर तालुक्यातून जाणाऱ्या रस्त्यावर घातलेल्या मुरूम उत्खनन प्रकरणी येथे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या प्रकरणात उपकंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरूच आहे. रस्ता रूंदीकरणात भरावाकरिता मुरूम उपलब्ध नसल्याने काम बंद करण्यात आल्याची माहिती आहे.गोंदिया-तुमसर-रामटेक महत्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट रस्ता बांधकाम सध्या बंद आहे. सिमेंटची कामे पावसाळ्यात करण्याकरिता कंत्राटदार धडपड करीत आहे, परंतु खोदलेल्या रस्ता भरावात मुरूम उपलब्ध नसल्याने दुसरा मार्ग खड्डेमय आहे. यापूर्वी माती व मुरूमाचा भराव करण्यात आला होता.एकेरी मार्गाचे सिमेंटीकरण झाले आहे. दुसरा मार्ग अद्याप खोदलेलाच आहे. मोहाडी व तुमसर तालुक्यात यापूर्वी मुरूम व माती भरावात घालण्यात आली होती, परंतु मुरूम उत्खननावर प्रश्नचिन्ह व तक्रारी झाल्यानंतर महसूल प्रशासनाने उपकंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली होती. सदर प्रकरण अद्याप चौकशीत असल्याचे समजते. महामार्ग बांधकाम पूर्ण करण्याची मागणी आहेपुलाचे बांधकाम अपूर्णराष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले. अनेक पुलाचे काम अर्धवट आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला मुरूमाचा भराव करण्यात आला नाही. त्यामुळे एकेरी रस्त्यावरून वाहतूक करताना अपघाताची शक्यता बळावली आहे.रेतीघाट लिलाव बंदतुमसर-मोहाडी तालुक्यात रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. नाममात्र दोन घाट सुरू आहेत. रेतीची रॉयल्टी महाग असल्यानेही रस्त्याचे काम बंद केल्याची माहिती आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दिरंगाईचा फटका सामान्यांना बसत आहे. रस्ते सध्या चिखलमय झाले आहेत.
मुरूम, रेतीअभावी रखडले महामार्गाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 1:16 AM
गोंदिया-तुमसर-रामटेक महत्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट रस्ता बांधकाम सध्या बंद आहे. सिमेंटची कामे पावसाळ्यात करण्याकरिता कंत्राटदार धडपड करीत आहे, परंतु खोदलेल्या रस्ता भरावात मुरूम उपलब्ध नसल्याने दुसरा मार्ग खड्डेमय आहे. यापूर्वी माती व मुरूमाचा भराव करण्यात आला होता.
ठळक मुद्देमुरूम उपलब्ध नाही : रॉयल्टीची रेती महाग, तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्ग