मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काही पक्षांनी आदिवासींची दिशाभूल करुन केवळ ढोंगबाजी करत आहेत असा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते भंडाऱ्यात भाजप आयोजित मोर्चाला संबोधित करत होते.
भंडाऱ्यातील रुग्णालयातील दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपच्या वतीने आज भंडाऱ्यात मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीसांनी भंडऱ्यातील दुर्घटना हा अपघात असून सरकारी यंत्रणांच्या निष्काळजीपणातून झालेला खून आहे, असं म्हटलं आहे.
वाढीव वीजबिल माफीवरुन घुमजाव करणारं सरकार"राज्यातील सामान्य जनतेला आलेलं वाढीव वीजबिल माफीची घोषणा उर्जामंत्र्यांनी केली होती. त्यानंतर सरकारनं थेट घुमजाव केलं. अशाप्रकारचा ढोंगबाजी करणारं सरकार आजवर पाहिलेलं नाही. ठाकरे सरकार हे बेईमान सरकार आहे. या सरकारविरोधात लढा अशाच पद्धतीने यापुढील काळतही सुरूच राहील. दिलेला शब्द न पाळलेल्या ऊर्जामंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही", असं फडणवीस म्हणाले. राज्यातील जनतेच्या घरी कुणी वीज कनेक्शन कापण्यासाठी कुणी अधिकारी आलाच तर त्याला गुलाब देऊन त्याच्याच गाडीत बसवून घरी पाठवून द्या, असा सल्लाही फडणवीसांनी यावेळी दिला.
सरकारची योजना फक्त माल कमविणेमहाविकास आघाडी सरकारला राज्यातील सामन्य जनतेची काहीच पडलेली नाही. केवळ बिल्डरांसाठी हे सरकार काम करत असल्याचाही आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. "केवळ माल कमवणे हीच या सरकारची सर्वात मोठी योजना आहे. धान खरेदीतही मोठा घोटाळा झाला आहे", असं फडणवीस म्हणाले.